Join us

IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली

टीम इंडियाला चौथ्या दिवशीच सामना जिंकणार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 00:01 IST

Open in App

IND vs ENG 5th Test Day 3 Stumps : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीनंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३९६ धावा करत यजमान इंग्लंडसमोर ३७४ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाअखेरच्या अखेरच्या षटकात मोहम्मद सिराजनं सेट झालेल्या झॅक क्रॉउलीची विकेट घेत टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टीम इंडियाला चौथ्या दिवशीच सामना जिंकणार?  

झॅक क्राउली ३६ चेंडूत १४ धावा करून परतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी  इंग्लंडच्या संघाने धावफलकावर ५० धावा लावल्या होत्या. बेन डकेट ४८ चेंडूचा सामना करून ४ चौकाराच्या मदतीने ३४ धावांवर खेळत होता. इंग्लंडच्या संघाला जिंकण्यासाठी अजूनही ३२४ धावांची गरज आहे. क्रिस वोक्स आधीच आउट झाल्यामुळे टीम इंडियाला सामना जिंकत मालिका बरोबरीत राखण्यासाठी फक्त ८ विकेट्स घ्यायच्या आहेत. खेळपट्टी गोलंदाजांवर मेहरबान असल्यामुळे भारतीय संघ चौथ्या दिवशीच विजयाचा डाव साधत मालिका बरोबरीत राखेल असं चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडमोहम्मद सिराजयशस्वी जैस्वालरवींद्र जडेजावॉशिंग्टन सुंदर