IND vs ENG 5th Test Day 3 Stumps : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीनंतर नाईट वॉचमन आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरनं अर्धशतकी खेळी केली. या चौघांच्या दमदार बॅटिंगच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३९६ धावा करत यजमान इंग्लंडसमोर ३७४ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात मोहम्मद सिराजनं सेट झालेल्या झॅक क्रॉउलीची विकेट घेत टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाला चौथ्या दिवशीच सामना जिंकणार?
डावाची सुरुवात करताना पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून झॅक क्राउली ३६ चेंडूत १४ धावा करून परतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडच्या संघाने धावफलकावर ५० धावा लावल्या होत्या. बेन डकेट ४८ चेंडूचा सामना करून ४ चौकाराच्या मदतीने ३४ धावांवर खेळत होता. इंग्लंडच्या संघाला जिंकण्यासाठी अजूनही ३२४ धावांची गरज आहे. क्रिस वोक्स आधीच आउट झाल्यामुळे टीम इंडियाला सामना जिंकत मालिका बरोबरीत राखण्यासाठी फक्त ८ विकेट्स घ्यायच्या आहेत. खेळपट्टी गोलंदाजांवर मेहरबान असल्यामुळे भारतीय संघ चौथ्या दिवशीच विजयाचा डाव साधत मालिका बरोबरीत राखेल असं चित्र निर्माण झाले आहे.
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
यशस्वीचं शतक अन् आकाशदीपची पहिली फिफ्टी
पहिल्या डावात २३ धावांनी पिछाडीवर राहिलेल्या भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालनं १६४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११८ धावांची दमदार खेळी केली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामनयातील शतकी खेळीनंतर मालिकेचा शेवट त्याने क्लास सेंच्युरीसह केला. दुसऱ्या दिवसाअखेर नाईट वॉचमनच्या रुपात आलेल्या आकाशदीपनं ९४ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. त्याने यशस्वीसोबत केलेली शतकी भागीदारी इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडणारी अशी होती.
जड्डू-वॉशिंग्टनसह ध्रुव जुरेलचाही दिसला जलवा
यशस्वी जैस्वाल आणि आकाशदीपनं सेट केलेल्या परफेक्ट प्लॅटफॉर्मनंतर रवींद्र जडेजाने इंग्लंड दौऱ्यावर आणखी एक अर्धशतक झळकावले. त्याने ओव्हल कसोटीतील दुसऱ्या डावात ७७ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. पंतच्या जागी खेळणारा जुरेल ध्रुव ४६ चेंडूत ३४ धावा करून माघारी फिरल्यावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरनं ४६ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५३ धावांची दमदार खेळी केली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने ३९६ धावा केल्या. इंग्लंडकडून जॉश टंगनं पाच विकेट्सचा डाव साधला. याशिवाय गस ॲटकिन्सन ३ तर जेमी ओव्हरटन याने २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.
Web Title: IND vs ENG 5th Test Day 3 Stumps Mohammed Siraj Removes Crawley To Cap Strong Day for India Now England need 324 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.