IND vs ENG 5th Akash Deep Maiden Fifty : ओव्हलच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज आकाशदीप याने नाइट वॉचमनच्या रुपात मैदानात उतरुन बॅटिंगमधील धमक दाखवली. दुसऱ्या दिवसाअखेर साई सुदर्शनची विकेट पडल्यावर मैदानात उतरलेल्या आकाशदीपनं तिसऱ्या दिवशी यशस्वीच्या साथीनं भारतीय संघाला सामन्यात मजबूती देणारी भागीदारी रचताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. नाईट वॉचमनच्या रुपात आलेल्या आकाशदीपनं सॉलिड फिफ्टीसह इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरश: झोप उडवली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आकाशदीप आधी या भारतीय फिरकीपटूनं दोन वेळा नाईट वॉचमनच्या रुपात ठोकलीये 'फिफ्टी'
दुसऱ्या दिवसाअखेर जोखीम कमी करण्यासाठी टीम इंडियाने आकाशदीपवर खेळलेला डाव यशस्वी ठरला. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी साकारली. याआधी २०१० मध्ये अमित मिश्रानं बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात नाईट वॉचमनच्या रुपात येईन ५० धावांची दमदार खेळी केली होती. एवढेच नाही तर २०११ मध्ये या माजी फिरकीपटूनं ओव्हलच्या मैदानातच नाईट वॉचमनची जबाबदारी निभावताना ८४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता आकाशदीपच्या भात्यातून क्लास खेळी पाहायला मिळाली आहे.
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
यशस्वी जैस्वालसोबतची त्याची भागीदारी ठरू शकते मॅचचा टर्निंग पाइंट
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ १-२ अशा पिछाडीवर आहे. ओव्हल कसोटी जिंकून मालिका बरोबरीत राखण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने २३ धावांची अल्प आघाडी घेतल्यावर लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वालनं ४६ धावांची भागीदारी रचली. पण ७० धावांवर भारतीय संघाने दोन विकेट्स गमावल्या. दुसऱ्या दिवसाअखेर आकाशदीप मैदानात आला. त्याने तिसऱ्या विकेटसाठी यशस्वीसोबत शतकी भागीदारी रचली. ही भागीदारी मॅचचा एक टर्निंग पाइँंट ठरेल, अशी आहे.
Web Title: IND vs ENG 5th Test Day 3 Akash Deep Maiden Fifty For India As Night Watchman Role At Kennington Oval London
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.