IND vs ENG 5th Test Chris Woakes Bat Possibly One Handed : ओव्हल कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात जो रुट आणि हॅरी ब्रूक यांच्या शतकी खेळीनंतर सामना इंग्लंडच्या बाजूनं झुकला होता. शतक साजरे केल्यावर आकाशदीपच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रूक तंबूत परतला. त्यानंतरही इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत होता. पण प्रसिद्ध कृष्णानं आपल्या भेदक माऱ्यासह जेकब बेथलसह शतकवीर जो रुटला तंबूत धाडलं अन् सामन्यात नवा ट्विस्ट आला. धावफलकावर ३३७ धावा असताना जो रूट माघारी फिरला अन् इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये पहिल्या डावात न खेळलेल्या क्रिस वोक्सनं गरज पडल्यास बॅटिंग करण्यासाठी तयार आहे, असे संकेत देणाऱ्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या.
...अन् खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स बॅटिंगसाठी झाला तयार
प्रसिद्ध कृष्णानं जो रुटला तंबूत धाडत हातून निसटलाय असं वाटतं असलेल्या सामन्यात भारतीय संघासाठी पुन्हा एक संधी निर्माण केली. इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये पराभवाची भीतीही दिसली. खांद्याच्या दुखापतीमुळे क्रिस वोक्स उर्वरित सामन्यात खेळणार नाही, असे ECB नं अधिकृतरित्या स्पष्ट केले होते. दुखापतीमुळे आउट झाल्यावर तो कॅज्युअल आउटफिट्समध्येच संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये बसल्याचे दिसून आले. पण चौथ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा संघ अडचणीत दिसताच ड्रेसिंग रुममध्ये वेगळ्या हालचालींना वेग आला. तो मॅचची व्हाइट जर्सी घालून तयार झाला. गरज पडल्यास संघासाठी एका हातानेही बॅटिंग करण्यासाठी तयार असल्याचे चित्रच त्याच्या या हालचालींमधून दिसून आले.
...म्हणून क्रिस वोक्स बॅटिंगसाठी उतरण्याची तयारी करताना दिसला
तिसऱ्या सत्राच्या खेळ सुरु झाला त्यावेळी इंग्लंडच्या संघाला विजयासाठी ५७ धावांची गरज होती. हॅरी ब्रूक परतल्यानंतरही क्रिस वोक्सशिवाय ५ विकेट्स त्यांच्या हातात होत्या. त्यामुळे सामन्यात यजमान संघच मजबूत स्थितीत होता. पण प्रसिद्ध कृष्णानं जेकब बेथेल पाठोपाठ जो रुट यांची विकेट घेत इंग्लंडचं टेन्शन वाढवलं. ओव्हलच्या मैदानात गठ्ठ्यानं विकेट्स पडताना पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच क्रिस वोक्स बॅटिंगसाठी तयार होतानाचे चित्रही दिसून आले.
इंग्लंडला हव्या ३५ धावा, टीम इंडियाला ४ विकेट्सची गरज
अंधूक प्रकाश अन् त्यानंतर सुरु झालेला पावसामुळे खेळ चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडच्या संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात ३३९ धावा केल्या होत्या. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला अजूनही ३५ धावांची गरज आहे. दुसरीकडे भारतीय संघाला ट्विस्टनंतर बेस्ट कामगिरीसह सामना जिंकण्यासाठी ४ विकेट्सची गरज आहे. जर भारतीय संघाने पाचव्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले तर क्रिस वोक्स बॅटिंगसाठी आल्याचे पाहायला मिळू शकते. खांद्याच्या दुखापतीमुळे तो एका हातानेही बॅटिंगही करताना दिसू शकते.
Web Title: IND vs ENG 5th Test Chris Woakes Has Ready England Dressing Room Come Out To Bat Possibly One Handed Should His Team Require It After Prasidh Krishna dismisses Joe Root
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.