IND vs ENG 5th T20 : दुसऱ्या चेंडूवर विकेट पडली, तरीही इंग्लंडच्या फलंदाजांनी विराट कोहलीची चिंता वाढवली 

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : भुवनेश्वर कुमारनं ( Bhuvneshwar Kumar) दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याचा त्रिफळा उडवला, पण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 10:09 PM2021-03-20T22:09:41+5:302021-03-20T22:24:13+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th T20 : From 0-1 to 100-1, this is great partnership by Dawid Malan and Jos Buttler, eng 2/130 | IND vs ENG 5th T20 : दुसऱ्या चेंडूवर विकेट पडली, तरीही इंग्लंडच्या फलंदाजांनी विराट कोहलीची चिंता वाढवली 

IND vs ENG 5th T20 : दुसऱ्या चेंडूवर विकेट पडली, तरीही इंग्लंडच्या फलंदाजांनी विराट कोहलीची चिंता वाढवली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माविराट कोहली या नव्या जोडीनं टीम इंडियाच्या धावांचा मजबूत पाया रचला. रोहित व विराट या दोघांनी अर्धशतकी खेळी केली, तर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या यांनीही हात धुवून घेतले. भारतानं २० षटकांत २ बाद २२४ धावा चोपून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. भुवनेश्वर कुमारनं ( Bhuvneshwar Kumar) दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याचा त्रिफळा उडवला, पण त्यानंतर जोस बटलर ( Jos Buttler ) व डेवीड मलान ( Dawid Malan) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी टीम इंडियाचं टेंशन वाढवलं.. Ind Vs Eng 5th T20 Live Update Score विराट कोहलीनं पाडला विक्रमांचा पाऊस, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा पराक्रम

पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाला पहिला धक्का बसला. रोहितनं ३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६४ धावा केल्या. रोहित माघारी परतल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) षटकारानं डावाची सुरुवात केली.  विराट व सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी २६ चेंडूंत ४९ धावा चोपल्या. पण, १४ व्या षटकात या भागीदारीला ब्रेक लागला. सूर्यकुमारनं १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३२ धावा केल्या. Ind Vs Eng T20 Match Today, Ind Vs Eng 5th T20 Live Match What a Catch!; ख्रिस जॉर्डनच्या अविश्वसनीय कॅचनं सर्वांना वेड लावलं; सूर्यकुमार यादवला Out केलं, Video


विराटनं ट्वेंटी-२०तील २८वे अर्धशतक ३७ चेंडूंत पूर्ण केलं. हार्दिक पांड्या १७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३९ धावांवर नाबाद राहिला. विराट ५२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारनं धक्का दिला. भुवीनं सलामीवीर जेसन रॉयचा त्रिफळा उडवला. पण, जोस बटलर ( Jos Buttler ) व डेवीड मलान ( Dawid Malan) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तिसऱ्या ट्वेंटी-२०त बटलरनं नाबाद ८३ धावा करताना भारताला पराभूत केलं होतं. मालिकेत आतापर्यंत फार चांगली कामगिरी करू न शकलेला जागतिक क्रमवारीतील अव्वल फलंदाज मलाननं दमदार खेळ केला. १३व्या षटकात ही भागीदारी तुटली. या दोघांनी ८२ चेंडूंत १३० धावांची भागीदारी केली. भुवीनं जोस बटलरला ( ५२) बाद केले. 

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा विक्रम डेवीड मलाननं नावावर केला. त्यानं २४ डावांत हा पराक्रम करताना बाबर आझम ( २६ डाव) व विराट कोहली ( २७) यांचा विक्रम मोडला. ( Dawid Malan becomes the quickest batsman to complete 1000 T20I run) १५व्या षटकात शार्दूल ठाकूरनं सामन्याला कलाटणी दिली. त्यानं जॉनी बेअरस्टो ( ७) व मलान य़ांना बाद केले. मलान ४६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला.

Web Title: IND vs ENG 5th T20 : From 0-1 to 100-1, this is great partnership by Dawid Malan and Jos Buttler, eng 2/130

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.