IND vs ENG 5th Test Day 2 Heated Exchange Between Joe Root And Prasidh Krishna : इंग्लंड-भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात रंगला आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव २२४ धावांवर आटोपल्यावर इंग्लंडच्या संघाने आपल्या पहिल्या डावाच्या खेळाला सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांसह कर्णधार ओली पोपही माघारी फिरल्यावर जो रुटवर सर्वांच्या नजरा होत्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात वाजलं, KL राहुल अंपायरवर चिडला
आधुनिक क्रिकेट जगतातील सर्वोत्तम बॅटर मैदानात आपल्या शांत स्वभावासाठीही ओळखला जातो. पण प्रसिद्ध कृष्णासोबत त्यानं राडा केल्याचे पाहायला मिळाले. दोघांच्यातील शाब्दिक चकमक झाली. हा वाद मिटवण्यासाठी पंचांना हस्तक्षेप करावा लागला. एवढेच नाही तर पंचांच्या हस्तक्षेपानंतर लोकेश राहुलही सक्रीय झाला अन् त्याने पंचासमोर आपली नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
नेमकं काय घडलं?
इंग्लंडच्या डावातील २२ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत होता. चेंडू टाकल्यावर तो जो रुटला काही तरी बोलला. शांत राहून आपल्या बॅटिंगवर फोकस करण्यावर भर देणाऱ्या रुटनं त्याला रिप्लाय दिला. दोघांच्यातील वाद सोडवायला मैदानातील पंच कुमार धर्मसेना यांनी हस्तक्षेप केला. ते प्रसिद्ध कृष्णाला ताकीद देताना दिसले. ही गोष्ट पंतच्या जागी उप कर्णधारपदाची जबाबदारी मिळालेल्या केएल राहुलला खटकली. त्यांनी बोलायचं अन् आम्ही त्यांचे एकून शांत बसायचं असं अजिबात घडणार नाही, असे म्हणत तो फक्त आमच्या खेळाडूंवर गप्प करु नका, असे काहीसे पंचांना म्हणताना दिसून आले. पंच त्याला तसं नाही राहुल...असं म्हणत फलंदाजी करणाऱ्याला गोलंदाजानं काही बोलू नये, ही आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले. मैदानातील हा ड्रामा दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
जो रुटही स्वस्तात आटोपला
मैदानात प्रसिद्ध कृष्णासोबत वाजल्यावर जो रुट फार काळ मैदानात टिकला नाही. इंग्लंडच्या धावफलकावर १७५ धावा असताना मोहम्मद सिराजनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. रुटनं ४५ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने २९ धावांवर पायचित झाला.
Web Title: IND vs ENG 5 th Test Day 2 Heated Exchange Between Joe Root And Prasidh Krishna KL Rahul Unhappy With The Umpire Kumar Dharmasena Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.