Join us  

Washington Sunder : वॉशिंग्टन सुंदरच्या 'या' फोटोने डोळ्यात आणले पाणी; लक्ष्मण, जाफर यांनी कौतुकानं पाठ थोपटली

IND vs ENG, 4th Test : Washington Sundar ९६ धावांवर खेळत असताना समोर तीन फलंदाज होते, परंतु एकामागून एक तिघेही माघारी परतले अन् नॉन स्ट्राईकर एंडला सुंदर खाली बसला व नशीबानं मांडलेल्या थट्टेचा विचार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 1:31 PM

Open in App

India vs England, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या ( Washington Sunder) हुकलेल्या शतकानं सर्वांना वाईट वाटलं... ९६ धावांवर खेळत असताना समोर तीन फलंदाज होते, परंतु एकामागून एक तिघेही माघारी परतले अन् नॉन स्ट्राईकर एंडला सुंदर खाली बसला व नशीबानं मांडलेल्या थट्टेचा विचार करत होता. पण, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) उपस्थित प्रत्येकजण टाळ्यांचा कडकडाट करून सुंदरचे कौतुक करत होता. रिषभ पंतचे ( Rishabh Pant) शतक अन् सुंदरच्या ९६ धावांच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. वैयक्तिक खेळीसह सुंदरनं सातव्या आणि आठव्या विकेटसाठी अनुक्रमे रिषभ व अक्षर पटेल यांच्यासह शतकी भागीदारी करून मोठं योगदान दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचे फलंदाज अडकले. Ind vs Eng live test score from Narendra Modi Stadium  सुनील गावस्कर यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अर्धशतक; सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट, BCCIकडून सत्कार

मॅच हायलाईट्स 

- चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस रिषभ पंतनं गाजवला.  ६ बाद १४६ वरून त्यानं वॉशिंग्टनच्या साथीनं टीम इंडियाला २५९ धावांपर्यंत नेले. रिषभ व वॉशिंग्टन यांनी सातव्या विकेटसाठी १५८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या. रिषभ ११८ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०१ धावांवर माघारी परतला. test cricket, India vs England 4th test cricket 

- रिषभनंतर वॉशिंग्टननं जबाबदारीनं खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांची शाळा घेतली. ऑस्ट्रेलियात शार्दूल ठाकूरसोबत खंबीरपणे उभा राहिलेल्या सुंदरनं इंग्लंडच्या गोलंदाजांनाही दमवलं. त्याला अक्षर पटेलकडूनही तोलामोलाची साथ मिळाली.

- भारताकडून प्रथमच सातव्या आणि आठव्या विकेटसाठी एकाच कसोटीत शतकी भागीदारी झाल्या. वॉशिंग्टन सुंदर-रिषभ पंत यांनी सातव्या विकेटसाठी ११३ ( १५८ चेंडू ) आणि वॉशिंग्टन - अक्षर पटेल १०६ ( १७९ चेंडू) यांनी शतकी भागीदारी केली.  वाह मित्रांनो, चांगली मैत्री निभावलीत; वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर राहिला नाबाद, वीरूसह नेटिझन्सनी इशांत, सिराजला झोडपलं

- अक्षर पटेला बाद झाला तेव्हा टीम इंडियाच्या ८ बाद ३६५ धावा होत्या. अक्षरनं ९७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. तेव्हा वॉशिंग्टन ९६ धावांवर होता. उर्वरित दोन फलंदाजांना त्याला केवळ साथ द्यायची होती, परंतु इशांत शर्मा व मोहम्मद सिराज यांना बेन स्टोक्सनं शून्यावर बाद केलं आणि वॉशिंग्टनचं शतकाचं स्वप्न अपूरं राहिलं. Video : पहिल्या चेंडूवर चौकार, अपर कट अन् षटकारानं पूर्ण केलं अर्धशतक; वीरेंद्र सेहवागचा अंदाज तोच

- वॉशिंग्टन १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ९६ धावांवर नाबाद राहिला. भारतानं पहिल्या डावात ३६५ धावा केल्या आणि १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं चार, जेम्स अँडरसननं तीन आणि जॅक लिचनं दोन विकेट्स घेतल्या.

कसोटीत ९०+ धावांवर नाबाद राहिलेले भारतीय फलंदाजअजित वाडेकर ( ९१*)गुंडप्पा विश्वनाथ ( ९७*) दीलिप वेंगसरकर ( ९८*)सौरव गांगुली ( ९८*)राहुल द्रविड ( ९१*)आर अश्विन ( ९१*)वॉशिंग्टन सुंदर ( ९६*)  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडवॉशिंग्टन सुंदरवासिम जाफर