Anshul Kamboj Maiden Wicket Ben Duckett Miss Century : मँचेस्टर कसोटी सामन्यातून कसोटीत पदार्पण कऱणाऱ्या अंशुल कंबोजनं बेन डकेटच्या रुपात पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केलीये. इंग्लंडच्या या सलामीवीरानं पदार्पणाच्या सामना खेळणाऱ्या अंशुल कंबोजला सुरुवातीला सेट होऊ दिले नव्हते. या गोष्टीटचा बदला घेताना अंशुलनं इंग्लिश बॅटरला शतकाच्या उंबरठ्यावर असताना तंबूचा रस्ता दाखवला. बेन डकेट ९४ धावांवर माघारी फिरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! बेन डकेटनं तीन चौकारांसह केलं होतं अंशुल कंबोजचं स्वागत
मँचेस्टरच्या चौथ्या कसोटी सामन्यात पदार्पणाची सामन्यात बॅटिंग वेळी अंशुल कंबोजच्या पदरी भोपळा पडला. भारतीय संघाचा डाव आटोपल्यावर बुमराहसोबत त्याने गोलंदाजीला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहनं पहिले षटक निर्धाव टाकल्यावर अंशुल कंबोज दुसरे षटक घेऊन आला. पहिल्याच षटकात बेन डकेट याने तीन चौकार मारत त्याचे स्वागत केले. पहिल्या स्पेलमध्ये ५ षटकात त्याने २९ धावा खर्च केल्या. पण विकेट काही हाती लागली नाही.
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी
दुसऱ्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात साधला पहिल्या विकेटचा डाव
इंग्लंडच्या डावातील ३७ व्या षटकात शुबमन गिलनं पुन्हा चेंडू अंशुल कंबोजच्या हाती सोपवला. या षटकात एका नो बॉलसह चौकार देत त्याने दुसऱ्या स्पेलची सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमधील दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अंशुल कंबोजनं उत्तम चेंडूवर सेट झालेल्या बेन डकेटला आपल्या जाळ्यात अडकवले. विकेटमागे ध्रुव जुरेल याने त्याचा कॅच टिपला. बेन डकेट ाने १०० चेंडूत १३ चौकाराच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली.