Join us  

"हे काय दाखवत बसलाय... रिप्ले दाखव ना..."; रोहित शर्मा भडकला, Video झाला व्हायरल

रोहित सुरुवातीला फार वेळ बघत बसला. पण त्यानंतर त्याचा संयम सुटला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 4:02 PM

Open in App

Rohit Sharma Reaction Viral Video, IND vs ENG 4th Test Live: रोहित शर्मा त्याची फलंदाजी आणि उत्कृष्ट नेतृत्वकौशल्यासाठी ओळखला जातो. पण त्यासोबतच तो मैदानावर आणि मैदानाबाहेर त्यांच्या प्रतिक्रियांसाठीही प्रसिद्ध आहे. रोहित शर्माने रांची कसोटीतही असेच काहीसे केले आहे. जाडेजाच्या चेंडूवर टीम इंडियाने रूटविरुद्ध रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचाने त्याला नाबाद ठरवले. सर्व खेळाडू रिप्लेची वाट पाहू लागले पण कॅमेरामन रोहित शर्माला मोठ्या स्क्रीनवर सतत दाखवत होते. हे पाहून रोहित शर्मा संतापला आणि हातवारे करत रिप्ले दाखवा असे ओरडून म्हणाला. मोठ्या पडद्यावर हा प्रकार दिसला आणि त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

रोहितवर कायमच फोकस

यापूर्वीही रोहित शर्मासोबत असे घडले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेदरम्यानही कॅमेरामनने त्याच्यावर रिव्ह्यूचे लक्ष केंद्रित केले होते, त्यानंतर त्याने अशीच प्रतिक्रिया दिली होती. रांची कसोटीच्या रिव्ह्यूबद्दल बोलायचे झाले तर, थर्ड अंपायरने रूटला नॉट आउट दिले आणि या खेळाडूने शानदार फलंदाजी करत या मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले.

रांचीमध्ये इंग्लंडची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त

रांची कसोटीत रुट आणि फोक्सने चांगली फलंदाजी केली. पण या संघाची टॉप ऑर्डर उपाहारापूर्वी पॅव्हेलियनमध्ये परतली. उपाहारापर्यंत इंग्लंडने पाच विकेट गमावल्या होत्या. बेन डकेट, ऑली पोप, बेन स्टोक्स, जॅक क्रॉली आणि बेअरस्टो झटपट बाद झाले. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या आकाश दीपला चांगली सुरूवात मिळाली. आकाश दीपने बेन डकेट, ऑली पोप आणि जॅक क्रॉलीच्या विकेट घेतल्या. बेअरस्टोला अश्विनने आणि स्टोक्सला जाडेजाने बाद केले.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माजो रूटसोशल मीडियासोशल व्हायरल