भारत इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात जो रुट आणि ओली पोप यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना दमवलं. २ बाद २२५ धावांवरुन खेळाला सुरुवात करताना या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी रचली. कर्णधार शुबमन गिलनं ज्याच्यावर सुरुवातीला भरवसा दाखवला नाही तोच गोलंदाज ही जोडी फोडण्यात कामी आला. वॉशिंग्टन सुंदरनं आपल्या सहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आधी सेट झालेल्या ओली पोपला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेला हॅरी ब्रूकही त्याच्या गळाला लागला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या षटकासाठी वॉशिंग्टनला ६८ व्या षटकापर्यंत पाहावी लागली वाट
इंग्लिश कंडिशनचा विचार करून शुबमन गिल फिरकीच्या तुलनेत जलदगती गोलंदाजांवर अधिक भरवसा दाखवताना दिसतोय. त्यामुळेच वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीसाठी आणण्यासाठी त्याने खूप उशील केला. इंग्लंडच्या डावातील ६८ व्या षटकात गिलनं चेंडू वॉशिंग्टन सुंदरच्या हाती सोपवला. या स्पेलमधील सहाव्या षटकात वॉशिंग्टन याने सुंदर चेंडूवर आधी ओली पोपला अन् त्यानंतर हॅरी ब्रूकला आपल्या जाळ्यात अडकवले.
Most Run Scorers In Test: जो रुटनं साधला मोठा डाव; कॅलिस-द्रविडला टाकलं मागे, सचिन टॉपला
३ षटकात २ विकेट्स
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ७७ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरनं एका अप्रतिम चेंडूवर ओली पोपला चकवा दिला. स्लिपमध्ये लोकेश राहुलनं कोणतीही चूक न करता त्याचा झेल टिपला अन् टीम इंडियाला तिसरे यश मिळाले. ओली पोपनं १२८ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ७१ धावांची खेळी केली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या हॅरी ब्रूकला वॉशिंग्टन सुंदरनं यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरीव यष्टिचित केले. पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात तो वॉशिंग्टन सुंदरच्या जाळ्यात सापडला. लेट गोलंदाजीला येऊन पहिल्या स्पेलमध्ये त्याने ३ षटकात २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.
Web Title: IND vs ENG 4th Test Day 4 Washington Sundar Picks Harry Brook Wicket After Ollie Pope
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.