IND vs ENG 4th Test Day 4 England 669 All Out Leads India By 311 Runs : जो रुटच्या विक्रमी खेळीनंतर कर्णधार बेन स्टोक्सनं केलेल्या १४१ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ६६९ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावानंतर ३११ धावांची मोठी आघाडी घेत टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज निर्माण केले आहे. मँचेस्टर कसोटी सामना जिंकण सोडा सामना अनिर्णित राखणंही टीम इंडियासाठी चॅलेंजिंग झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बेन स्टोक्सचं शतक अन् नवव्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि लियाम डॉसन या जोडीनं ७ बाद ५४४ धावांवरुन ५४४ धावांवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या दिवसातील पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहनं डॉसनच्या रुपात इंग्लंडच्या संघाला आठवा धक्का दिला. दुसऱ्या बाजूला बेन स्टोक्सनं शतक साजरे केले. १९८३ पाच विकेट्सचा डाव साधल्यावर शतक साजरे करणारा तो पहिला कर्णधार ठरला. जडेजाने १४१ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लावला. पण त्याआधी इंग्लिश कर्णधाराने ब्रायडन कार्सच्या साथीनं ९ व्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचली.
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
टीम इंडियाकडून जड्डूनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स
जड्डूने ब्रायडन कार्सची विकेट घेत इंग्लंडच्या संघाला पहिला डावात ६६९ धावांवर थांबवले. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराहाने प्रत्येकी २-२ तर अंशुल कंबोज आणि मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली.
Web Title: IND vs ENG 4th Test Day 4 England 669 All Out Leads India By 311 Runs Stokes Makes 141
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.