IND vs ENG 4th Test Day 3 Ben Stokes Retires Hurt : मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानातील कसोटी सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजीत 'पंजा' मारणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधाराने फलंदाजी वेळी अर्धशतक झळकावले. टीम इंडियाविरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिकेतील त्याच्या भात्यातून पहिली फिफ्टी आली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे ३६ वे अर्धशतक ठरले. पण त्यानंतर इंग्लंडच्या कर्णधारावर मैदान सोडण्याची वेळ आली. जो रुटसोबत तगडी भागीदारी केल्यावर बेन स्टोक्स धाव घेताना लंगडताना दिसला. डाव्या पायाला स्नायू दुखापतीची समस्या उद्भवल्यामुळे बॅटिंग कायम ठेवण्याची रिस्क घेण्याऐवजी त्याने 'रिटायर्ड हर्ट' होऊन मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रुटसोबत तगडी भागीदारी, मग आली 'रिटायर्ड हर्ट' होण्याची आली वेळ
मँचेस्टर कसोटीतील पहिल्या डावात ११६ चेंडूंचा सामना करताना स्टोक्सनं ६६ धावांची खेळी केली. त्याने जो रुटसोबत सहाव्या विकेटसाठी १४२ धावांची मोठी भागीदारी रचली. पण ११५ व्या षटकाच्या शेवटी इंग्लंडचा कर्णधाराने मैदान सोडलं अन् त्याच्या जागी जेमी स्मिथ मैदानात उतरला.
Most Run Scorers In Test: जो रुटनं साधला मोठा डाव; कॅलिस-द्रविडला टाकलं मागे, सचिन टॉपला
बॅटिंग वेळी मैदान सोडलं, गोलंदाजीत प्रभाव कायम राखणार का?
पायात चमक ( क्रॅम्प) भरल्यामुळे इंग्लंडच्या कर्णधारावर मैदान सोडण्याची वेळ आली. बेन स्टोक्स हा मागील वर्षभरात अनेकदा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा सामना करताना दिसला आहे. भारत इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेत त्याने फलंदाजीच्या तुलनेत अधिक षटके गोलंदाजीही केली आहे. पहिल्या डावात पाच विकेट्सचा डाव साधल्यावर अर्धशतकी खेळी करून त्याने टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीये. बॅटिंग न करू शकलेला बेन स्टोक्स गोलंदाजीत प्रभावी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. जर दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकला नाही, तर टीम इंडियासाठी सामन्यात कमबॅक करण्याची एक चांगली संधी निर्माण होऊ शकते.
Web Title: IND vs ENG 4th Test Day 3 Why Ben Stokes Retired Hurt Of Fourth Test Between India And England In Manchester
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.