अँडरसन-तंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या कसोटी मालिकेत आघाडीवर असलेल्या यजमान इंग्लंडच्या संघाने मँचेस्टर कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेतली आहे. २ बाद २२५ धावांवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केल्यावर जो रुटनं १५० धावांची विक्रमी खेळी साकारली. याशिवाय ओली पोपनं १२८ चेंडूत केलेल्या ७१ धावांच्या खेळीनंतर बेन स्टोक्सच्या भात्यातूनही मोठी खेळी पाहायला मिळाली. ६६ धावांवर रिटायर्ड हर्ट झाल्यावर तो पुन्हा मैदानात उतरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलग तीन सत्रात इंग्लंडचा जलवा, टीम इंडियासाठी कमबॅक करणं झालंय मुश्किल
तिसऱ्या दिवसाअखेर कर्णधार बेन स्टोक्स ७७ (१३४) आणि लियाम डॉसन २१ (५२) मैदानात खेळत होते. इंग्लंडच्या संघाने ७ बाद ५४४ धावांसह करत १८६ धावांची मोठी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसातील दोन सत्रानंतर तिसऱ्या दिवशी तिन्ही सत्रात इंग्लंडच्या संघाने आपला दबदबा दाखवून देत मँचेस्टर कसोटी सामन्यात टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली आहे. इंग्लंडच्या संघाने या सामन्यावर मजबूत पकड मिळवली असून मँचेस्टर कसोटीसह मालिकेत कमबॅक करणं टीम इंडियासाठी अधिक मुश्किल झाले आहे.
Most Run Scorers In Test: जो रुटनं साधला मोठा डाव; कॅलिस-द्रविडला टाकलं मागे, सचिन टॉपला
वॉशिंग्टन याने ओली पोप-जो रुट जोडी फोडली, पण...
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जो रुट आणि ओली पोप या जोडीनं भारतीय गोलंदाजांचे अक्षरश: खांदे पाडले. पहिल्या सत्राच्या खेळात दोघांनी बुमराह, सिराज, शार्दुल ठाकूर, अंशुल कंबोजसह जड्डूच्या गोलंदाजीवर नेटाने फलंदाजी केली. वॉशिंग्टन आला अन् पहिला स्पेल टाकण्याची संधी मिळताच त्याने काही क्षणात दोन विकेट्स घेतल्या. पण तोपर्यंत खूप उशील झाला होता. कारण ओली पोप आणि जो रुटनं तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावा केल्या होत्या. ७१ धावांवर बाद केले. त्याची जागा घेण्यासाठी आलेला हॅरी ब्रूकही स्वस्तात माघारी फिरला. या दोन विकेट्सनंतर टीम इंडिया इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणेल, अशी आशा निर्माण झाली. पण मग रुट अन् बेन स्टोक्स जोडी जमली.
रुटची विक्रमी खेळी, बेन स्टोक्सनंही ठोकल मालिकेतील पहिलं अर्धशतक
वॉशिंग्टन सुंदरनं इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले. पण त्यानंतर जो रुटनं कर्णधार बेन स्टोक्सच्या साथीनं पुन्हा नव्याने जाव माडला. रुटनं मोठी खेळी करत अनेक विक्रमाला गवसणी घातली. दुसऱ्या बाजूला बेन स्टोक्सनं या मालिकेतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. स्नायू दुखापतीमुळे तो 'रिटायर्ड हर्ट' होऊन तंबूत परतला. दरम्यान जो रुट १५० धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने ही महत्त्वपूर्ण विकेट घेतली. बुमराहनं जेमी स्मिथला तर सिराजनं क्रिस वोक्सला तंबूत धाडत आपल्या विकेटचा रकाना भरला. पण 'रिटायर्ड हर्ट' कॅप्टन पुन्हा मैदानात उतरला अन् तो दिवसाअखेर नाबाद राहिला. दुसऱ्या बाजूला आठ वर्षांनी कमबॅकची संधी मिळालेला लियाम डॅवॉसही चांगली फलंदाजी करत होता.