VIDEO: पायाला फ्रॅक्चर असतानाही मैदानात उतरला पंत; ओल्ड ट्रॅफर्डच्या प्रेक्षकांनी उभं राहून ठोकला सलाम

Injured Rishabh Pant Return to Bat: व्वा पंत...दुखापतीनंतर पुन्हा मैदानात उतरला पंत, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:29 IST2025-07-24T17:28:10+5:302025-07-24T17:29:15+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 4th Test Day 2 Rishabh Pant Is Hobbling Out To A Standing Ovation From The Old Trafford Crowd Watch Video | VIDEO: पायाला फ्रॅक्चर असतानाही मैदानात उतरला पंत; ओल्ड ट्रॅफर्डच्या प्रेक्षकांनी उभं राहून ठोकला सलाम

VIDEO: पायाला फ्रॅक्चर असतानाही मैदानात उतरला पंत; ओल्ड ट्रॅफर्डच्या प्रेक्षकांनी उभं राहून ठोकला सलाम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर या जोडीनं नव्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. सलग चार अर्धशतके झळकवणारा जडेजाला बाद करत जोफ्रा आर्चरनं टीम इंडियाला पाचवा धक्का दिला. तो तंबूत परतल्यावर शार्दुल ठाकूरनं दमदार खेळी केली. पण अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करताना तो फसला. त्याची विकेट पडल्यावर जे अपेक्षित नव्हते ते चित्र पाहायला मिळाले. कारण पाय फॅक्चर असताना रिषभ पंत मैदानात उतरला.  

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात पंतला चाहत्यांकडून स्टँडिंग ओव्हेशन

मँचेस्टर कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात रिषभ पंत दुखापतीनंतर मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. शार्दुल ठाकूरची विकेट पडल्यावर तो मैदानात उतरत असताना मँचस्टर येथील लॉर्ड्सच्या मैदानातील प्रेक्षकांनी उभे राहून लढवय्या पंतच्या निर्णयाला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. दुखापतग्रस्त पंत  दुसऱ्या दिवशी संघाला जॉईन झाल्याची गोष्ट शेअर करताना BCCI नं तो विकेट किपिंग करणार नसला तरी गरज पडल्यास बॅटिंग करेल, हे स्पष्ट केले होते. पण एवढ्या लवकर तो मैदानात उतरेल, असे वाटले नव्हते. 

 धाव घेतानाही लंगडताना दिसला पंत

पहिल्या डावात धावफलकावर ३१४ धावा असताना बेन स्टोक्स याने टीम इंडियाला  शार्दुल ठाकूरच्या रुपात सहावा धक्का दिला. त्याने ८८ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे नियोजित वेळेच्या आधी लंच ब्रेकचा निर्णय घेण्य्यात आला. रिषभ पंत दोन धावांची भर घालून ५५ चेंडूत ३९ धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन सुंदर याने ७२ चेंडूचा सामना करत २० धावा केल्या होत्या. मैदानात उतरताना थोडा लंगडतच तो मैदानात आला.  धाव घेतानाही तेच दिसले. त्याची ही लढवय्यावृत्ती कौतुकास्पद असून सोशल मीडियावर पंतच्या या अंदाजाला क्रिकेट चाहते सलाम करताना दिसत आहेत.

वोक्सच्या चेंडूवर झाली होती दुखापत

पहिल्या दिवसाच्या खेळात क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप फटका मारताना चेंडू पंतच्या उजव्या पायवर लागला. स्कॅनिंगनंतर पायाला फॅक्चर असल्याचे निदान झाले. पण नियमानुसार, त्याच्या जागी अन्य कुणाला बॅटिंग करता येत नसल्यामुळे महत्त्वपूर्ण लढतीत त्याने या परिस्थितीतही मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: IND vs ENG 4th Test Day 2 Rishabh Pant Is Hobbling Out To A Standing Ovation From The Old Trafford Crowd Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.