Rishabh Pant Fighting Fifty : रिषभ पंत याने मँचेस्टर कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात पायाला फॅक्चर असताना मैदानात उतरुन उपयुक्त अर्धशतकी खेळी केली. पहिल्या दिवसाच्या खेळात ४८ चेंडूत ३७ धावांवर लंगडत मैदान सोडलेला पंत गंभीर दुखापतीनंतरही २४ तासांच्या आत पुन्हा मैदानात उतरला. जोफ्रा आर्चरनं एका उत्तम चेंडूवर त्याला बोल्ड केले. पण त्याआधी बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर कडक चौकार मारत पंतनं ६९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुखापतीनंतर पंतन २७ चेंडूचा केला सामना, जोफ्रानं केलं बोल्ड
फॅक्चर पायासह मैदानात उतरलेल्या रिषभ पंतनं दुसऱ्या दिवशी बॅटिंगला आल्यावर २७ चेंडूचा सामना केला. आपल्या खात्यात १७ धावा जोडत त्याने अर्धशतकासह भारतीय संघाला ३५० पार नेले. जोफ्रा आर्चरनं एका सुंदर चेंडूवर पंतचा खेळ खल्लास केला. दुखापतग्रस्त पंतच्या जागी अन्य कोणताही फलंदाजा असता तर त्याच्यासाठी या चेंडूचा सामना करणं कठीण होते.