Rishabh Pant Fighting Fifty : रिषभ पंत याने मँचेस्टर कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात पायाला फॅक्चर असताना मैदानात उतरुन उपयुक्त अर्धशतकी खेळी केली. पहिल्या दिवसाच्या खेळात ४८ चेंडूत ३७ धावांवर लंगडत मैदान सोडलेला पंत गंभीर दुखापतीनंतरही २४ तासांच्या आत पुन्हा मैदानात उतरला. जोफ्रा आर्चरनं एका उत्तम चेंडूवर त्याला बोल्ड केले. पण त्याआधी बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर कडक चौकार मारत पंतनं ६९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुखापतीनंतर पंतन २७ चेंडूचा केला सामना, जोफ्रानं केलं बोल्ड
फॅक्चर पायासह मैदानात उतरलेल्या रिषभ पंतनं दुसऱ्या दिवशी बॅटिंगला आल्यावर २७ चेंडूचा सामना केला. आपल्या खात्यात १७ धावा जोडत त्याने अर्धशतकासह भारतीय संघाला ३५० पार नेले. जोफ्रा आर्चरनं एका सुंदर चेंडूवर पंतचा खेळ खल्लास केला. दुखापतग्रस्त पंतच्या जागी अन्य कोणताही फलंदाजा असता तर त्याच्यासाठी या चेंडूचा सामना करणं कठीण होते.
VIDEO: पायाला फ्रॅक्चर असतानाही मैदानात उतरला पंत; ओल्ड ट्रॅफर्डच्या प्रेक्षकांनी उभं राहून ठोकला सलाम
असा पराक्रम करणारा पहिला विकेट किपर बॅटर ठरला पंत
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील अर्धशतकासह रिषभ पंतनं काही खास विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताकडून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता अव्वलस्थानी पोहचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्या भात्यातून ५ व्यांदा फिफ्टी प्लस धावसंख्या पाहायला मिळाली.
एका कसोटीत सर्वाधिक वेळा फिफ्टी प्लस धावा करणारे भारतीय विकेट किपर बॅटर
- ५- रिषभ पंत विरुद्ध इंग्लंड (२०२५)
- ४ -फारुख इंजिनियर विरुद्ध इंग्लंड (१९७२-७३)
- ४- महेंद्रसिंह धोनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२००८-०९)
- ४ - महेंद्रसिंह धोनी विरुद्ध इंग्लंड (२०१४)
Web Title: IND vs ENG 4th Test Day 2 Rishabh Pant Is A Warrior A Fighting Fifty Despite His Injury
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.