Chris Woakes Breaks Yashasvi Jaiswal’s Bat : भारत-इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी अंतर्गत सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वाल जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. बहुतांशवेळा आक्रमक अंदाजात फटकेबाजी करण्याला पसंती देणारा यशस्वी जैस्वालनं यावेळी संयमी खेळी करत डावाला आकार देण्यावर भर दिला. दरम्यान पहिल्या डावाच्या सुरुवातीला कमालीचा संयम दाखवला. दरम्यान वोक्सचा चेंडू संयमीरित्या खेळून काढताना यशस्वी जैस्वालच्या बॅटचा दांडा निखळल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वीची बॅट तुटली, किती वेगाने आला होता चेंडू
भारतीय संघाच्या पहिल्या डावातील नवव्या षटकात क्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर यशस्वी जैस्वालची बॅटच तुटल्याचे पाहायला मिळाले. आता बॅट तुटली म्हटल्यावर चेंडू किती वेगानं टाकला असेल, असा प्रश्न पडू शकतो. पण क्रिस वोक्सनं हा चेंडू फक्त १२६ kph एवढ्या वेगाने टाकला होता.
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
यशस्वी कोणत्या कंपनीची बॅट वापरतो? या बॅटची किंमत किती माहितीये?
भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल हा SG कंपनीची YBJ 19 (Yashasvi Jaiswal) इंग्लिश विलो बॅट वापरतो. या बॅटची मूळ किंमत ९९,९९९ असून वेगवेगळ्या क्रिकेट स्टोअरमध्ये सवलतीच्या दरात कमी अधिक फरक दिसून येतो. यशस्वी जैस्वाल हा क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळापासून SG कंपनीची बॅट वापरतो. २०२५ मध्ये तो या कंपनीसोबत करारबद्ध झाला. त्यानंतर कंपनीने SG YBJ‑19 Original Players Bat सह बॅटही लॉन्च केली.
Web Title: IND vs ENG 4th Test Chris Woakes breaks Yashasvi Jaiswal’s bat into pieces with thunderbolt in Manchester Test Watch Video Ball Speed And Bat Price
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.