Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?

Team India Playing XI for 4th Test vs England at Manchester : नव्या चेहऱ्याला संधी; ८ वर्षांनी कमबॅक करणाऱ्या करुण नायरचा पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:30 IST2025-07-23T15:21:02+5:302025-07-23T15:30:52+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 4th Test Anshul Kamboj receives India debut cap Sai Sudarshan Replace Karun Nair Shardul Thakur Team India Playing XI | Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?

Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Playing XI for 4th Test vs England at Manchester Anshul Kamboj receives India debut cap : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. सलग चौथ्यांदा भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलनं इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत टॉस गमावला आहे. बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलाय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

तीन बदलासह मैदानात उतरली टीम इंडिया

भारतीय संघाकडून अंशुल कंबोज याला पदार्पणाची संधी देण्यात आली असून करुण नायरच्या जागी साई सुदर्शनची टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झालीये. याशिवाय नितीश कुमार रेड्डीच्या जागी शार्दुल ठाकूरलाही संधी देण्यात आली आहे. 

गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

भारताकडून कसोटी खेळणारा ३१८ वा खेळाडू ठरला अंशुल


देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची खास छाप सोडल्यावर अंशुल कंबोज हा इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय 'अ' संघाचा भाग होता. भारतीय संघाच्या ताफ्यातील खेळाडू  दुखापतीनं त्रस्त असल्यामुळे बॅकअप खेळाडूच्या रुपात अंशुल कंबोज याला संघात सामील करून घेण्यात आले होते. गोलंदाजीसह फलंदाजीत तो उपयुक्त खेळाडू असल्यामुळे लेट एन्ट्रीनंतर त्याला थेट कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. भारताकडून कसोटी खेळणारा तो ३१८ वा खेळाडू ठरलाय.

करुण नायरचं करिअर संपलं?

देशांतर्गत क्रिकेमध्ये धमक दाखवल्यावर भारताचा कसोतील दुसरा त्रिशतकवीर ठरलेल्या करुण नायर याला ८ वर्षांनी कमबॅकची संधी मिळाली होती. पण पहिल्या तीन कसोटी सामन्यात ६ डावात तो सातत्याने अपयशी ठरला. ६ डावात त्याने फक्त  १३२ धावा केल्या. यात ४० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली. चौथ्या कसोटी सामन्यात युवा साई सुदर्शनला संधी देत करूण नायरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. कदाचित लॉर्ड्सच्या मैदानात खेळलेला कसोटी सामना करुण नायरसाठी अखेरचा ठरू शकतो. कारण इथूनं पुढे त्याला टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळणं मुश्किल  वाटते.


भारत (प्लेइंग इलेव्हन):

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (क), ऋषभ पंत (डब्ल्यू), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज

Web Title: IND vs ENG 4th Test Anshul Kamboj receives India debut cap Sai Sudarshan Replace Karun Nair Shardul Thakur Team India Playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.