Join us

India vs England 4th test Live : इंग्लंडच्या कर्णधाराला होता विजयाचा विश्वास, पण भारताच्या 'या' खेळाडूनं लावली वाट, Video 

भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडल्यानंतर इंग्लंडनं प्रत्युत्तरात २९० धावा करून ९९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात ४६६ धावा कुटल्या व इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 23:15 IST

Open in App

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : टीम इंडियानं चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी यजमान इंग्लंडचा डाव २१० धावांवर गुंडाळून १५७ धावांनी विजय मिळवताना मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडल्यानंतर इंग्लंडनं प्रत्युत्तरात २९० धावा करून ९९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात ४६६ धावा कुटल्या व इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडला हे आव्हान पेलवलं नाही. हसीब हमीद व रोरी बर्न्स यांनी शतकी सलामी दिल्यानंतर हा सामना सहज जिंकू, असे इंग्लंडचा कर्णधार जो रूट यालाही वाटलं होतं. पण, होत्याचं नव्हतं झालं अन् यजमानांना सामना गमवावा लागला. Joe Root नं या सामन्यातील खरा टर्निंग पॉईंट सांगितला.

एक तीर से दो शिकार!; : टीम इंडियानं इंग्लंडला लोळवून पाकिस्तानच्या स्वप्नांचा केला चुराडा!

''आम्हाला विजयाची संधी होती, परंतु टीम इंडियाला श्रेय द्यायला हवं. या सामन्यातून काहीच हाती न लागल्यानं निराश झालो आहे. चेंडू रिव्हर्स होऊ लगला आणि तेथेच भारतीय गोलंदाजांनी बाजी मारली. पहिल्या डावात आणखी जास्तीच्या धावांची आघाडी घेता आली असती, तर निकाल काही वेगळा लागू शकला असता,''असेही रूट म्हणाला.   तो म्हणाला, ''जसप्रीत बुमराह हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. पाचव्या दिवशी लंच ब्रेकनंतर त्याच्या स्पेलनं सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या त्या स्पेलनं सामनाच फिरवला.'' जसप्रीत बुमराहनं या लंच ब्रेकनंतर ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांचा त्रिफळा उडवून कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण केले. भारताकडून सर्वात कमी २४ डावांमध्ये १०० कसोटी विकेट्स घेणारा तो जलदगती गोलंदाज ठरला. त्यानं कपिल देव यांचा २५ डावांत १०० विकेट्सचा विक्रम मोडला. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटजसप्रित बुमराह
Open in App