IND vs ENG, 4th T2O : पहिल्या षटकात षटकार अन् चौकार; रोहित शर्मानं मारला मोठ्या पराक्रमाचा षटकार

IND vs ENG, 4th T2O : Rohit Sharma सूर्यकुमार यादव आणि राहुल चहर यांनी इशान किशन व युझवेंद्र चहल यांच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पक्के केले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 07:12 PM2021-03-18T19:12:32+5:302021-03-18T19:17:39+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th T2O : Rohit Sharma completes his 9000 runs in T20 format, he becomes the first player to hit 50 sixes in India in T20Is | IND vs ENG, 4th T2O : पहिल्या षटकात षटकार अन् चौकार; रोहित शर्मानं मारला मोठ्या पराक्रमाचा षटकार

IND vs ENG, 4th T2O : पहिल्या षटकात षटकार अन् चौकार; रोहित शर्मानं मारला मोठ्या पराक्रमाचा षटकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरवले. सातत्यान अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) कर्णधार विराट कोहलीन संघात कायम राखले. सूर्यकुमार यादव आणि राहुल चहर यांनी इशान किशन व युझवेंद्र चहल यांच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पक्के केले. रोहितनं आदिल राशिदनं टाकलेल्या पहिल्याच षटकात खणखणीत षटकार व चौकार मारून टीम इंडियाला दणक्यात सुरुवात करून दिली.

रोहितनं या कामगिरीसह ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ९००० धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीनंतर ट्वेंटी-20त ९००० धावा करणारा तो पहिलाच भारतीय आहे. ( Rohit Sharma completes his 9000 runs in T20 format) 
शिवाय ट्वेंटी-२०त ५० षटकार पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाजाचा मानही त्यानं पटकावला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पहिल्या चेंडूवर षटकार खेचणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. ( Rohit Sharma becomes the first Indian to hit a Six in first ball of a T20I innings) 

ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज 
विराट कोहली - ९६५०
रोहित शर्मा - ९०००*
सुरेश रैना - ८४९४
शिखर धवन - ८१०२  

ट्वेंटी-२० षटकार
५० - रोहित शर्मा
४८ - विराट कोहली
३२ - युवराज सिंग 

ख्रिस गेल - १३७२०
किरॉन पोलार्ड - १०६२९
शोएब मलिक - १०४८८
ब्रेंडन मॅकलम - ९९२२
डेव्हिड वॉर्नर - ९८२४
अॅरोन फिंच - ९७१८
विराट कोहली - ९६५०
एबी डिव्हिलियर्स - ९१११


 England Playing XI:  जेसन रॉय, डेवीड मलान, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदील राशिद, मार्क वूड
India Playing XI : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर 

Web Title: IND vs ENG, 4th T2O : Rohit Sharma completes his 9000 runs in T20 format, he becomes the first player to hit 50 sixes in India in T20Is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.