IND vs ENG 3rd Test Day 4 Washington Sundar Cleans Up The Dangerous Joe Root And Jamie Smith : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. चौथ्या दिवसाच्या खेळातील दुसऱ्या डावात जलगती गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावल्यावर फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर याने आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवून देताना टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
..अन् टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर, इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत
इंग्लंडच्या डावातील ४३ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर याने इंग्लंडच्या ताफ्यातील फलंदाजीतील प्रमुख आधारस्तंभ असलेल्या जो रूटचा त्रिफळाचित करत टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. १५४ धावांवर इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला असून रुटच्या विकेटसह टीम इंडियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात आपली पकड मजबूत केलीये. जो रूटनं पहिल्या डावात शतक ठोकले होते. दुसऱ्या डावात आघाडीच्या विकेट्स गमावल्यावर त्याने कर्णधार बेन स्टोक्सच्या साथीनं डाव सावरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या जेमी स्मिथलाही वॉशिंग्टन सुंदरनं आपल्या जाळ्यात अडकवले असून या दोन विकेट्स मिळाल्यामुळे टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
रुटनंतर वॉशिंग्टनं सुंदरनं जेमी स्मिथलाही केलं बोल्ड
इंग्लंडच्या संघाने ८७ धावांवर ४ विकेट्स गमावल्यावर जो रुटनं बेन स्टोक्सच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली. ही जोडी फोडणं आव्हानात्मक झाले असताना वॉशिंग्टन सुंदरनं चेंडू हाती सोपवल्यावर जो रुटच्या रुपात या सामन्यातील पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. पुढच्या षटकात त्याने जेमी स्मिथलाही चकवा दिला. कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या दोघांची विकेट घेऊन वॉशिंग्टन सुंदरनं टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सोपा केला आहे.
उर्वरित चार विकेट्स घेऊन लॉर्ड्सचं मैदान गाजवण्याची संधी
यजमान इंग्लंड संघाने १६४ धावांवर ६ विके्स गमावल्या आहेत. दुसऱ्या सत्रापर्यंत इंग्लंडच्या संघाने १७५ धावा केल्या असून तिसऱ्या सत्रात उर्वरित ४ विकेट्स घेऊन चौथ्या दिवशीच भारतीय संघ दुसऱ्या डावाची सुरुवात करणार का? ते पाहण्याजोगे असेल.