IND vs ENG 3rd Test Brydon Carse Clashes With Ravindra : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानातील भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळात रवींद्र जडेजा आणि ब्रायडन कार्स या दोघांची टक्कर अन् त्यानंतर दोघांच्यात शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना खुन्नस दिली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या दोघांच्यातील वाद मिटवताना दिसून आले. नेमकं काय घडलं? वाद सध्या चर्चेचा मुद्दा ठ मिड-पिचवर ब्रायडन कार्से आणि रवींद्र जडेजा यांच्यात जोरदार वाद झाल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय घडलं?
तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी टीम इंडिया अडचणीत असताना जड्डू आणि नितीश कुमार रेड्डी संघाच्या डावाला आकार देत होते. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील ३५ व्या षटकात ब्रायडन कार्स गोलंदाजी करत होता. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू जडेजानं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं खेळला. पहिली धाव पूर्ण करताना जड्डू अन् कार्स यांच्यात धडक झाली.
ब्रायडन कार्स भडकला, मग जड्डूही त्याच्या दिशेनं धावला, पण...
जड्डूनं पहिली धाव पूर्ण केल्यावर टक्कर झाल्यावरही दुसरी धाव घेतली. त्यानंतर ब्रायडन कार्स त्याच्यावर भडकल्याचे दिसून आले. यावर जड्डू त्याच्या दिशेनं आला अन् चेंडूकडे बघत असल्यामुळे हे घडलं, असे स्पष्टीकरण देताना दिसले. दोघांच्यात वातावरण तापलं असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं दोघांच्यामध्ये उभा राहून भांडण मिटवण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.
लंचआधी टीम इंडियाची सेट झालेली जोडीही फुटली
भारतीय संघ अंडचणीत असताना रवींद्र जडेजानं नितीश कुमार रेड्डीच्या साथीनं आठव्या विकेटसाठी ३० धावांची खेळी केली. ही जोडी टीम इंडियाला अशक्य वाटणारा सामना जिंकून देईल, असे वाटत असताना क्रिस वोक्सनं लंटआधी नितिश कुमार रेड्डीच्या रुपात भारतीय संघाला ११२ धावांवर आठवा धक्का दिला.