DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

बेन डकेटची विकेट अन् सिराजचं आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:49 IST2025-07-14T15:47:15+5:302025-07-14T15:49:25+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd Test Team India Pacer Mohammed Siraj Has Been Penalised By ICC Following An Aggressive Reaction To A Wicket Of Ben Duckett | DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 3rd Test Mohammed Siraj Fined : लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लिश फलंदाजासमोर दंगा करत पंगा घेणं भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज याला चांगलेच महागात पडलं आहे. ICC टीम इंडियाच्या गोलंदाजावर कारवाई केली असून मैदानातील त्या कृत्याबद्दल सिराजला मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बेन डकेटची विकेट अन् सिराजचं आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन

लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानातील भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात मोहम्मद सिराज याने इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याची महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती. ही विकेट मिळवल्यावर बॅटरसमोर जात सिराजनं आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते.  आयसीसी आचार संहितेचे  (Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. 

पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक

सिराजवर काय कारवाई झाली?

आयसीसीने या प्रकरणात सिराजवर दंडात्मक कारवाई केली आहे. ICC च्या आचार संहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्या प्रकरणी त्याच्या खात्यात एक डेमेरिट गुण जमा करण्यात आला असून सामन्यातील मानधनाच्या १५ टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे. 

तिसऱ्या कसोटी सामन्यात सिराजचा 'चौकार'

इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मोहम्मद सिराज याने जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स या दोघांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना त्याने बेन डकेटसह ओली पोपला स्वस्तात माघारी धाडले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केल्यानंतर आक्रमक अंदाजातील सेलिब्रेशनमुळे त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

भारत-इंग्लंड यांच्यातील सामना रंगतदार स्थितीत

भारत-इंग्लंड दोन्ही संघांनी पहिल्या डावात ३८७ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाने १९२ धावा करत टीम इंडियासमोर १९३ धावांचे टार्गेट सेट केले आहे. या धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ५८ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी दोन्ही संघांना सामना जिंकण्याची संधी आहे.

Web Title: IND vs ENG 3rd Test Team India Pacer Mohammed Siraj Has Been Penalised By ICC Following An Aggressive Reaction To A Wicket Of Ben Duckett

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.