Join us  

Ind vs Eng 3rd Test : आर अश्विनचा अहमदाबाद कसोटीत विश्वविक्रम; सर रिचर्ड हॅडली यांना टाकलं मागे

Ind Vs england test match : अहमदाबाद कसोटीचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागण्याची चिन्हे आहेत. भारताचा पहिला डाव १४५ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या डावात शतकी वेसही ओलांडता आली नाही

By स्वदेश घाणेकर | Published: February 25, 2021 7:22 PM

Open in App

Ind Vs england test match : अहमदाबाद कसोटीचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागण्याची चिन्हे आहेत. भारताचा पहिला डाव १४५ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या डावात शतकी वेसही ओलांडता आली नाही. पहिल्या डावात सहा विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेलनं ( Axar Patel) नं दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. डे नाईट कसोटीत ११ विकेट्स घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. आर अश्विन ( R Ashwin) यानंही त्याला साजेशी साथ दिली. अश्विननं दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावांचा पल्ला सर केला आणि एका वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. सर्वात कमी कसोटींमध्ये ४०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अश्विननं दुसरं स्थान पटकावलं.  (Ashwin became the second quickest bowler )

कसोटीत ४०० विकेट्स घेणारा अश्विन हा चौथा ( अनिल कुंबळे, कपिल देव व हरभजन सिंग) भारतीय गोलंदाज आहे, तर जगातला सहावा फिरकीपटू आहे. अनिल कुंबळे ( ६१९), कपिल देव ( ४३४) आणि हरभजन सिंग ( ४१७) यांनी भारतासाठी ४००+ विकेट्स घेतल्या आहेत.  

अश्विननं कसोटीत सर्वात जलद १०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत तिसरे, २०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत तिसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर सर्वात जलद ३०० विकेट्सचा विक्रम त्यानं स्वतःच्या नावावर केला.  त्यानं ७७ कसोटीत ही कामगिरी करून सर्वात जलद ४०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. मुथय्या मुरलीधरननं ७२ कसोटीत हा पराक्रम केला. अश्विननं सर रिचर्ड हॅडली व डेल स्टेन ( ८० कसोटी) यांचा विक्रम मोडला.  अक्षर पटेलकडून आर अश्विनच्या World Recordची पुनरावृत्ती, ११४ वर्षानंतर भारतीय फिरकीपटूंनी दोनदा केली कमाल

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनअनिल कुंबळेकपिल देवहरभजन सिंग