Join us  

IND vs ENG Live: इंग्लंडला पहिला झटका! अश्विनचं 'मिशन ५००' पूर्ण; ठरला दुसरा भारतीय

IND vs ENG 3rd Test Live: गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 3:10 PM

Open in App

IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi | राजकोट: भारतीय संघ विकेटच्या शोधात असताना पुन्हा एकदा आर अश्विन आपल्या संघासाठी धावून आला. वेगवान गोलंदाजांची धुलाई होताच कर्णधार रोहित शर्माने फिरकीपटूंच्या हाती चेंडू सोपवला. बेन डकेटने स्फोटक खेळी करून यजमानांची डोकेदुखी वाढवली. त्याला झॅक क्रॉली सावध खेळी करून साथ देत होता. पण, अश्विनने आपल्या तगड्या अनुभवाचा फायदा घेत क्रॉलीला बाद करून इंग्लंडला पहिला झटका दिला. या बळीसह अश्विनने ५०० बळी घेण्याची किमया साधली. अनिल कुंबेळेनंतर सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

सर्वाधिक बळी घेणारे शिलेदार -

  1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - ८०० बळी
  2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - ७०८ बळी
  3. जेम्स अँडरसन (इंग्लंड) - ६९६ बळी
  4. अनिल कुंबळे (भारत) - ६१९ बळी
  5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - ६०८ बळी
  6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - ५६३ बळी
  7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) - ५१९ बळी
  8. नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) - ५१७ बळी
  9. आर अश्विन (भारत) - ५०० बळी

तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने १३०.५ षटकांत सर्वबाद ४४५ धावा केल्या. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी करून मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. याशिवाय पदार्पणवीर सर्फराज खानने ६२ धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून पहिल्या डावात मार्क वुडने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर रेहान अहमद २ आणि जेम्स अँडसरन, टॉम हार्टली, आणि जो रूट यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज. 

तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड व जेम्स अँडरसन.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनभारतीय क्रिकेट संघ