लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळात जोफ्रा आर्चरनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. टीम इंडियाच्या विजयाची मोठी आस असलेला रिषभ पंत अवघ्या ९ धावा करून तंबूत परतला. एका अप्रितम चेंडूवर जोफ्रानं त्याला क्लीन बोल्ड केले. जोफ्रानं घेतलेली ही विकेट मॅचला टर्निंग पाइंट देणारी अशीच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर फसला पंत
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी १३५ धावांची गरज असताना लोकेश राहुलनं पंतच्या साथीनं खेळाला सुरुवात केली. बोटाच्या दुखापतीनं त्रस्त असलेल्या पंतनं जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर दोन चौकार मारले. पण शेवटी जोफ्रानं एक सुंदर चेंडू टाकत त्याला फसवले. भारतीय संघाच्या डावातील २१ व्या षटकातील जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर पाचव्या चेंडूवर रिषभ पंतने संयमीरित्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न फसवा ठरला. टप्पा पडल्यावर चेंडू इनस्विंग झाला अन् पंतवर बोल्ड होण्याची वेळ आली.
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
अल्व धावसंख्येचा पाठलाग करताना ७१ धावांवर अर्धा संघ तंबूत
जोफ्रा आर्चरनं पंतच्या रुपात टीम इंडियाला पाचवा धक्का दिला. १९३ धावांचा पाठलाग करताना अर्धा संघ अवघ्या ७१ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर बेन स्टोक्सनं केएल राहुलच्या रुपात आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. तो ३९ धावांवर पायचित झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला माघारी धाडत जोफ्रा आर्चरनं टीम इंडियाची वेदना आणखी वाढवल्याचे दिसून आले. ८२ धावांवर टीम इंडियाने आपली सातवी विकेट गमावली होती.