Joe Root Record : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुट याने टीम इंडियाच्या गोलंदाजीचा धैर्यानं सामना करत मोठा डाव साधलाय. टीम इंडियाविरुद्ध दमदार रेकॉर्ड असणाऱ्या जो रुटला पहिल्या दोन कसोटी सामन्यात आपल्या भात्यातील धमक दाखवता आली नव्हती. पण क्रिकेटच्या पंढरीत मैदानात नांगर टाकून या गड्याने संयमी खेळीसह पुन्हा एकदा आपल्यातील क्लास दाखवून दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाविरुद्ध विक्रमी कामगिरी; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव फलंदाज
तिसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकाला गवसणी घालण्याआधी ४५ धावा करताच जो रुटनं टीम इंडियाविरुद्ध ३००० धावांचा टप्पा गाठला. भारतीय संघाविरुद्ध हा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. या यादीत रिकी पॉटिंग दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिय माजी कर्णधाराने कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध २५५५ धावा केल्या आहेत. जो रूट याने २०१२ मध्ये भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते. ३३ व्या कसोटी सामन्यात त्याने टीम इंडियाविरुद्ध ३०४० पेक्षा अधिक धावा जमा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
IND vs ENG : बुमराहच्या गोलंदाजीवर टीम इंडियालाच बसला धक्का; पंत 'आउट'! नेमकं काय घडलंं?
कसोटीत १३ हजार पेक्षा अधिक धावा
जो रुट हा इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. १३ हजारहून अधिक धावा करताना त्याने ३६ शतकासह ६७ अर्धशतके झळकावली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ७१२६ धावा केल्या असून टी -२० क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात ८९३ धावांची नोंद आहे.
३७ व्या कसोटी शतकावर नजरा
टीम इंडियाविरुद्ध ३००० धावांसह विक्रम प्रस्थापित करणाऱ्या जो रुट इंग्लंडच्या मैदानात ७००० धावा करणाराही पहिला फलंदाज ठरला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी रुट १९९ चेंडूत ९ चौकारांसह ९९ धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवसाच्या खेळात तो कसोटीतील ३७ व्या शतक साजरे करुन आणखी नवे रेकॉर्ड सेट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.