IND vs ENG 3rd Test Jasprit Bumrah : लॉर्ड्स कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं कमालीची बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराहनं या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर चौकार मारत खाते उघडले. ७ महिन्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या भात्यातून धाव आली. मागील ४ सामन्यात त्याला खाते उघडता आले नव्हते. बुमराहनं सिडनी कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर सलग ४ डावात तो शून्यावर बाद झाला. लॉर्ड्स कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २८ व्या वेळी तो खाते न उघडता तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहची कमाल! जवळपास १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
जसप्रीत बुमराहनं मागील ७ डावात ०,०,२२,०,०,०,० अशी कामगिरी केली होती. दुसऱ्या डावात त्याने ५ धावांवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण या सामन्यात त्याने ५४ चेंडूचा सामना केला. जवळपास १ तास ४० मिनिटे त्याने जड्डूला साथ दिली. कसोटी कारकिर्दीत बुमराहाची ही सर्वाधिक वेळ मैदानात टिकण्याची पहिलीच वेळ ठरली. रवींद्र जडेजाच्या साथीनं नवव्या विकेटसाठी त्याने ३५ धावांची केलेली भागीदारी जबरदस्त अशीच होती.
लॉर्ड्सच्या मैदानातच आली होती कसोटीतील सर्वात मोठी खेळी
जसप्रीत बुमराहनं लॉर्ड्सच्या मैदानातच कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे. २०२१ च्या दौऱ्यात बुमराहनं ६४ चेंडूत ३४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या मैदानात त्याने तग धरल्याचे पाहायला मिळाले.