Join us  

तिसऱ्या टेस्टआधी इंग्लंडच्या माजी कर्णधाराने त्यांच्या संघाला दिली 'वॉर्निंग', काय म्हणाला वाचा

मायकल वॉर्न म्हणाला, "मला अशी भीती वाटते की आमचा संघ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 6:38 PM

Open in App

Michael Vaughan on IND vs ENG 3rd test: कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताने दमदार कमबॅक केला. इंग्लंडकडून 'बॅझबॉल' पद्धतीचा अवलंब केल्यापासून इंग्लंडला कसोटी क्रिकेटमध्ये चांगले यश मिळाले आहे. मात्र, या शैलीमुळे संघाला काही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यात ॲशेस मालिकेतील सामन्यांचाही समावेश आहे. इंग्लंडने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्धची शेवटची ॲशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती. यानंतर माजी कर्णधार मायकल वॉनला काळजी वाटत आहे की इंग्लंड एक असा संघ बनेल, जो कठोर परिश्रम करूनही जिंकण्यात अपयशी ठरू शकतो. मायकल वॉनने इंग्लंडच्या फलंदाजांना भारतात यशस्वी होण्यासाठी आक्रमक आणि पारंपारिक क्रिकेट शैलीमध्ये संतुलन राखण्याचा सल्ला दिला आहे.

मायकल वॉनने इंग्लंडला दिला इशारा

मायकल वॉनने 'द टेलिग्राफ'मधील आपल्या स्तंभात लिहिले आहे, 'इंग्लंड एक असा संघ बनला आहे, ज्यावर जास्त टीका केली जाऊ शकत नाही. कारण त्यांचा खेळ वेगळ्या पद्धतीचा आहे. तो पाहायला लोकांना फारच आवडतो. सध्याच्या संघाच्या खेळाने आम्ही खूप प्रभावित झालो आहोत आणि बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. तथापि, मला काळजी वाटते की ते एक असा संघ बनू शकतात जे इतके चमकदार कामगिरी करूनही अनेक सामने जिंकण्यात यशस्वी होत नाहीत. जेव्हा त्यांना ऍशेस मालिका जिंकायला हवी होती, तेव्हा ते जिंकू शकले नाहीत आणि आता त्यांनी भारताला मालिकेत पुनरागमन करण्याची संधी दिली आहे. विराट कोहलीसह अनेक मोठी नावे भारतीय संघात नसताना हा प्रकार घडला आहे.'

'बॅझबॉल'बद्दल महत्त्वाचे विधान

भारतातील पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली होती, पण बेन स्टोक्सच्या संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने शानदार पुनरागमन करत विजय मिळवला. इंग्लंडसाठी जॅक क्रॉली वगळता इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वॉन म्हणाला, 'इंग्लंड संघाने विशाखापट्टणमप्रमाणे फलंदाजी सुरू ठेवली तर मालिका जिंकता येणार नाही. मला वाटते की फलंदाजांनी आमच्या गोलंदाजांकडून काहीतरी शिकले पाहिजे. आमच्या गोलंदाजांनी पारंपारिक आणि बॅझबॉल शैलीचे उत्तम मिश्रण केले आहे. तसेच यापुढे गोलंदाजांनीही खेळावे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडइंग्लंडबेन स्टोक्सभारतीय क्रिकेट संघ