Join us

जड्डूनं केली रुटची गंमत! ९९ धावांवर रिस्क घेण्याची इंग्लिश बॅटरला झाली नाही हिंमत (VIDEO)

जड्डूचा तो इशारा... रुटनं रिस्क न घेता शतकी रोमान्स आधी ब्रेकअप नको, या विचाराने बदलला इरादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 01:08 IST

Open in App

IND vs ENG, Ravindra Jadeja Teases Joe Root :  भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिला दिवस जो रुटनं गाजवला. पहिल्या दोन कसोटी सामन्यातील अपयशानंतर जो रूटनं मैदानात नांगर टाकत संयमी खेळी केली. पहिल्या दिवसातील अखेरच्या षटकात जो रुटला शतक साजरे करण्यासाठी फक्त ४ धावांची गरज होती. स्ट्राइकही त्याच्याकडेच होते. पण त्याला पहिल्या दिवशी शतकी डाव काही साधता आला नाही.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

जड्डूनं केली रुटची गंमत

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी जो रुट ९९ धावांवर नाबाद खेळत होता. भारताकडून आकाश दीप घेऊन  आलेल्या या षटकात जो रुटनं ३ धावा काढल्या. एकेरी धाव घेत ९९ धावांवर पोहचल्यावर रवींद्र जडेजानं मजेशीर अंदाजात जो रुटला दुसरी धाव घेऊन शतक पूर्ण करण्याचं चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. 

IND vs ENG 3rd Test Day 1 Stumps: टीम इंडियासमोर 'बॅझबॉल' लव्हर्स इंग्लंडची 'कासव छाप' खेळी

नेमकं काय घडलं? 

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ८३ व्या षटकात आकाश दीप गोलंदाजीला आला. स्ट्राइकवर असलेल्या जो रुटनं त्याचा पहिला चेंडू निर्धाव खेळला.  दुसऱ्या चेंडूवर २ धावा घेत रुट ९८ धावांवर पोहचला. तिसरा चेंडू पुन्हा निर्धाव खेळल्यावर चौथ्या चेंडूवर जो रूटनं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं फटका मारला. एक धाव आरामात पूर्ण केल्यावर रुट शतक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या धावेसाठीही क्रिजमधून बाहेर पडला. पण चेंडू जड्डूच्या हाती असल्यामुळे त्याने आपला इरादा बदलला. ते पाहून जडेजाने हातातील चेंडू जमिनीवर ठेवत दुसरी धाव घे अन् शतक पूर्ण कर..असा इशारा जो रुटला केला. पण रुटनं रिस्क न घेता शतकी रोमान्स आधी ब्रेकअप नको, या विचाराने एका धावेवर समाधान मानल्याचे पाहायल मिळाले.  

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटरवींद्र जडेजा