विराट कोहलीला खेळताना पाहायचे आहे, पण... ! बेन स्टोक्सचे उत्तराने सर्वच चकीत

India vs England 3rd Test : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत क्रिकेट चाहते कोणाला मिस करत असतील तर तो म्हणजे विराट कोहली....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 03:23 PM2024-02-14T15:23:03+5:302024-02-14T15:26:00+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd Test : Ben Stokes said, "everyone wants to see Virat Kohli on the field. I wish him the best and hope he comes back soon on the cricket field". | विराट कोहलीला खेळताना पाहायचे आहे, पण... ! बेन स्टोक्सचे उत्तराने सर्वच चकीत

विराट कोहलीला खेळताना पाहायचे आहे, पण... ! बेन स्टोक्सचे उत्तराने सर्वच चकीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd Test : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत क्रिकेट चाहते कोणाला मिस करत असतील तर तो म्हणजे विराट कोहली.... विराटने वैयक्तिक कारण सांगून पहिल्या दोन कसोटीतून अचानक माघार घेतली. त्यानंतर तो तिसऱ्या कसोटीपासून खेळेल अशी चाहत्यांना आशा होती, परंतु बीसीसीआयने जाहीर केलेल्या उर्वरित ३ सामन्यांसाठीच्या संघात विराटचे नाव नसल्याने चाहते नाराज झाले. विराटची अनुपस्थिती इंग्लंडच्या फायद्याची असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यावर कर्णधार बेन स्टोक्सने ( Ben Stokes) आज त्याचे मत मांडले. 


इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स असे मानतो की भारताचा स्टार खेळाडू विराटच्या सध्याच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अनुपस्थितीला दौऱ्यासाठी सकारात्मक किंवा नकारात्मक असे लेबल लावू नये.  कोहलीची संघातून अनुपस्थिती वैयक्तिक कारणांमुळे आहे, ज्यामुळे त्याला संघातून माघार घ्यावी लागली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्या रजेच्या विनंतीचा आदर केला आहे आणि या काळात मीडिया आणि चाहत्यांना त्याच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगितले आहे. त्याच्या कारणांचे स्वरूप अज्ञात आहे.


भारतीय संघ या बदलाशी जुळवून घेत असल्याने, ही पोकळी भरून काढण्यासाठी रजत पाटीदार किंवा सर्फराज खान यांच्यासारख्या संभाव्य बदलांचा विचार केला जाऊ शकतो. "मला प्रश्नाचा अनादर करणारे काहीही म्हणायचे नाही. मला वाटते जेव्हा अशा परिस्थितीत, जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक कारणांमुळे मोठी मालिका आणि बरेच क्रिकेट गमावत असते, ज्याची आम्हाला खात्री नसते, तेव्हा आपण कोणतेही तर्क लावता कामा नये. आमच्या संघासाठी सकारात्मक किंवा नकारात्मक असे लेबल लावणे चुकीचे आहे,” असे स्टोक्सने ईसीबीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


स्टोक्सने कोहलीच्या निर्णयाचा आदर राखताना त्याला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, या विषयावर जास्त चर्चा करण्यापेक्षा त्याला त्याची मोकळीक द्यायला हवी. त्याच्या आयुष्यात सर्व काही चांगले व्हावे अशी मी प्रार्थना करतो. या परिस्थितीतून विराट लवकरच बाहेर पडेल आणि पुन्हा एकदा त्याच उत्साहात क्रिकेटच्या मैदानावर दिसेल, असा मला विश्वास आहे.  

 

 

Web Title: IND vs ENG 3rd Test : Ben Stokes said, "everyone wants to see Virat Kohli on the field. I wish him the best and hope he comes back soon on the cricket field".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.