Join us

IND vs ENG 3rd Test LIVE: टीम इंडिया ७८ धावांवर ऑल आऊट; ६९ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये झाली नाचक्की, पाहा सर्व विकेट्स!

ind vs eng 3rd test live updates cricket match score : लॉर्ड्स कसोटीवर ऐतिहासिक विजय मिळवणारे टीम इंडियाचे स्टार हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्यात दिवशी जमिनीवर कोसळले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 20:28 IST

Open in App

ind vs eng 3rd test live updates cricket match score : लॉर्ड्स कसोटीवर ऐतिहासिक विजय मिळवणारे टीम इंडियाचे स्टार हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्यात दिवशी जमिनीवर कोसळले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाचा पहिला डाव ७८ धावांवव गडगडला. रोहित शर्माच्या १९ धावा या भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा ठरल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं १८ धावा केल्या अन् १६ धावा अतिरिक्त मिळाल्या. भारताचे तळाचे पाच फलंदाज ११ धावांवर माघारी परतले.  इंग्लंडमधील टीम इंडियाची ही तिसरी निचांक कामगिरी ठरली आहे. ( 78 Is India's Third Lowest First Innings Total; Have Never Won Scoring Below 104) 

'लॉर्ड्स'वरून थेट जमिनीवर; टीम इंडियाच्या शिलेदारांनी इंग्लंडसमोर टेकले गुडघे!

भारत १९७४मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत ४२ आणि १९५२च्या मँचेस्टर कसोटीत ५८ धावांवर गडगडला होता. ६९ वर्षांनंतर भारतानं इंग्लंडमध्ये निचांक कामगिरी केली. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅडलेड कसोटीत टीम इंडियाचा डाव ३६ धावांवर गडगडला होता. पण, त्यानंतर टीम इंडियानं मालिकेत २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबाबत बोलायचे झाल्यात भारतीय संघ दुसऱ्यांदा १०० धावांहून कमी धावसंख्येत तंबूत परतला आहे.  

 

यापूर्वी २५ नोव्हेंबर १९८७साली दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा पहिला डाव ७५ धावांवर गडगडला होता. त्यानंतर २००८ मध्ये ७६ ( वि. दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद) ही निचांक खेळी होती अन् त्यानंतर आजचा डाव... १९९९मध्ये टीम इंडिया मोहाली कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध ८३ धावांत ढेपाळली होती.  

पाहा सर्व विकेट्स...

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजेम्स अँडरसनविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App