Join us  

IND vs ENG, 3rd T20, Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला एकही चेंडू न खेळवता बाकावर बसवलं, काय आहे विराट कोहलीचा प्लान?

IND vs ENG, 3rd T20 : Suryakumar Yadav making way for Rohit Sharma १४ मार्चला झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) आजच्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 7:02 PM

Open in App

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : १४ मार्चला झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) आजच्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक करताना जेव्हा हा निर्णय सांगितला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य बसले. स्थानिक क्रिकेट व इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) सातत्यानं धावा करूनही सूर्यकुमारला संधी मिळत नव्हती. त्यात इतक्या प्रतीक्षेनंतर ती मिळाली आणि त्याही सामन्यात त्याला एकही चेंडूचा सामना करायला मिळाला नाही. तरीही तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माला ( Rohit Sharma) IN करण्यासाठी सूर्यकुमारला OUT करण्यात आले. Ind Vs Eng 3rd T20, Ind Vs Eng T20 Live Score सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या पदार्पणानं वाढली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी; IPL 2022त दोघंही MIकडून खेळू शकणार नाहीत! सातत्यानं अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) आणखी एक संधी दिल्यामुळे चाहत्यांचा संताप आणखी वाढला. राहुलला पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे १ व ० धाव करता आली आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवन ( Shikhar Dhawan) अपयशी ठरला अन् त्याला विश्रांती दिली गेली. त्याच्या जागी इशान किशनला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं ३२ चेंडूंत ५६ धावा चोपून संधीचं सोनं केलं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात राहुलला विश्रांती देणं अपेक्षित होतं, परंतु घडलं वेगळंच...Ind Vs Eng T20 Match Today जसप्रीत बुमराहच्या 'या' आलिशान घरात राहणार नववधु संजना गणेशन, See Photo

टीम इंडिया Playing 11: इशान किशन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल

इंग्लंड Playing 11 : जेसन रॉय, जोस बटलर, डेवीड मलान, जॉन बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद, मार्क वूड  

काय आहे विराटचा प्लान?आगामी आयपीएल आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा लक्षात घेता विराट कोहली पुढील काही सामन्यांत विश्रांत घेण्याची शक्यता आहे. अशात उर्वरित दोन ट्वेंटी-20 सामन्यांत विराट स्वतः किंवा अन्य कोणत्यातरी खेळाडूला विश्रांती देऊन सूर्यकुमार यादवला खेळवण्याची शक्यता अधिक आहे. Ind Vs Eng T20 Live Match 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसूर्यकुमार अशोक यादवविराट कोहलीरोहित शर्मालोकेश राहुल