Ind Vs Eng 3rd T20 Live Score : १,०,०... लोकेश राहुलला ( KL Rahul) अपयशी ठरूनही कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात खेळवलं. सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) संघाबाहेर करताना रोहित शर्मासाठी ( Rohit Sharma) जागा तयार करण्यात आली. पण, लोकेशनं पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला अन् सामन्याच्या तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्क वूडनं ( Mark Wood) त्याचा त्रिफळा उडवला. मागील चार ट्वेंटी-२० सामन्यांत तो तिसऱ्यांदा भोपळ्यावर माघारी परतला आहे. ( KL Rahul has 3 ducks in the last 4 innings in T20 Internationals.) दुसऱ्या षटकात जीवदान मिळालेला रोहित मार्क वूडच्या गोलंदाजीवर पाचव्या षटकात माघारी परतला.
एकाच ट्वेंटी-२० मालिकेत दोन वेळा भोपळ्यावर बाद होणारा तो आशिष नेहरा ( आयसीसी वर्ल्ड कप २०१०) आणि अंबाती रायुडू ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१५) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय खेळाडू आहे. ट्वेंटी-20त सर्वाधिक ४ वेळा भोपळ्यावर बाद होण्य़ाच्या भारतीय सलामीवीराच्या विक्रमाशीही राहुलनं बरोबरी केली. रोहित शर्माही ४वेळा शून्यावर माघारी परतला आहे. दोन सामन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरलेला रोहित शर्माही ( १५) मोठी खेळी करू शकला नाही. मार्क वूडनं त्याला बाद केलं. 1,0,0 by KL Rahul in the T20 series - his poor run continues
सूर्य कुमार यादवला विश्रांती दिल्यानं संताप
१४ मार्चला झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) आजच्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक करताना जेव्हा हा निर्णय सांगितला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य बसले. स्थानिक क्रिकेट व इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) सातत्यानं धावा करूनही सूर्यकुमारला संधी मिळत नव्हती. त्यात इतक्या प्रतीक्षेनंतर ती मिळाली आणि त्याही सामन्यात त्याला एकही चेंडूचा सामना करायला मिळाला नाही. तरीही तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माला ( Rohit Sharma) IN करण्यासाठी सूर्यकुमारला OUT करण्यात आले.
सातत्यानं अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) आणखी एक संधी दिल्यामुळे चाहत्यांचा संताप आणखी वाढला. राहुलला पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे १ व ० धाव करता आली आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवन ( Shikhar Dhawan) अपयशी ठरला अन् त्याला विश्रांती दिली गेली. त्याच्या जागी इशान किशनला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं ३२ चेंडूंत ५६ धावा चोपून संधीचं सोनं केलं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात राहुलला विश्रांती देणं अपेक्षित होतं, परंतु घडलं वेगळंच...