Join us  

जसप्रीत बुमराहचा मारा पाहून सौरव गांगुलीचा BCCI ला थेट सवाल; म्हणाला, उगाच कशाला...

IND vs ENG 2nd Test : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 3:16 PM

Open in App

IND vs ENG 2nd Test ( Marathi News ) : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय.. यशस्वी जैस्वालच्या २०९ धावांच्या खेळीने भारताला ३९६ धावांचा डोंगर उभा करून दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने भेदक मारा करून इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. इंग्लंडचे सहा फलंदाज १७३ धावांवर माघारी परतले आहेत आणि यापैकी ३ विकेट्स बुमराहने घेतल्या आहेत. इंग्लंडचा संघ अजूनही २१९ धावांनी पिछाडीवर आहे. अशात भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याने BCCIला थेट सवाल केला आहे.

मागील काही वर्षात भारतीय जलदगती गोलंदाजांनी तगड्या प्रतिस्पर्धींना सैरभैर करून सोडले आहे. त्यात भारतीय खेळपट्टीवरही जलदगती गोलंदाजांचे वर्चस्व दिसले आहे. तरीही भारतात होत असलेल्या कसोटी सामन्यांसाठी फिरकीला पोषक खेळपट्टी बनवली जाते. यावरूनच सौरव गांगुलीने बीसीसीआयला सवाल केले आहेत.  त्याने ट्विट केलं की, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आदी जलदगती गोलंदाजांना जेव्हा गोलंदाजी करताना पाहतो, तेव्हा मला आश्चर्य वाटते की आपण आजही भारतात फिरकीला पोषक खेळपट्टी का तयार करतो. चांगल्या विकेट्सवर खेळण्याचा माझा विश्वास प्रत्येक सामन्यात दृढ होत चालला आहे. अश्विन, जडेजा, कुलदीप आणि अक्षर हे कोणत्याही खेळपट्टीवर २० विकेट मिळवतील. मागील ६ ते ७ वर्षांच्या घरच्या खेळपट्ट्यांमुळे फलंदाजीचा दर्जा घसरला आहे. चांगल्या विकेट्स आवश्यकता आहे. भारतीय संघ आजही ५ दिवसात सामना जिंकू शकतो.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसौरभ गांगुलीजसप्रित बुमराहबीसीसीआय