Join us  

India vs England, 2nd Test : आर अश्विनकडून इंग्लंडचा पाहुणचार; खणखणीत शतक अन् मोठा पराक्रम!

R Ashwin has slammed his fifth Test hundred घरच्या मैदानावर अश्विननं इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं. 

By स्वदेश घाणेकर | Published: February 15, 2021 3:20 PM

Open in App

India vs England, 2nd Test  Day 3 : आर अश्विन ( R Ashwin) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांच्या ९६ धावांच्या भागीदारीनं टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले आहे. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात धडाधड पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडेल, असा अंदाज होता. पण, अश्विन व विराट यांनी जुन्या चेंडूचा फायदा उचलताना इंग्लंडच्या गोलंदाजांना कुटले. दोघांनीही दमदार खेळी करताना भारताची आघाडी चारशेपार नेली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला. अम्पायर कॉल असल्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. घरच्या मैदानावर अश्विननं इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं. ( R Ashwin has slammed his fifth Test hundred)  विराट कोहलीनं केली चिटींग?; अम्पायरनी दिली सक्त ताकीद, टीम इंडियाला बसू शकतो फटका

-  सकाळच्या सत्रात पुजारा ( ७) पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर  यष्टीरक्षक बेन फोक्स यानं सुरेख पद्धतीनं रोहित शर्माला  ( २६)  यष्टिचीत करून माघारी पाठवले. बढती मिळालेला रिषभ पंत ( ८), अजिंक्य रहाणे (१०) आणि अक्षर पटेल ( ७) एकामागोमाग माघारी परतले. भारताची अवस्था ६ बाद १०६ अशी झाली होती.रेकॉर्ड ब्रेकर R Ashwin; घरच्या मैदानावर खऱ्या अर्थानं ठरला 'सिंघम'! 

- आर अश्विन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना दमवलं. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १७७ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला

- चेपॉकवर सातव्या विकेटसाठी भारतीय जोडीनं केलेली ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी, करुण नायर व रवींद्र जडेजा यांनी २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध १३८ धावा आणि मोहम्मद कैफ व पार्थिव पटेल यांनी २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०४ धावांची भागीदारी केली होती.-  आर अश्विन इंग्लंडविरुद्ध १०००+ धावा आणि १०० विकेट्स घेणारा सातवा खेळाडू ठरला. यापूर्वी जॉर्ज गिफन ( ऑस्ट्रेलिया), माँटी नोबल ( ऑस्ट्रेलिया), गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज) , रिचर्ड हॅडली ( न्यूझीलंड), कपिल देव ( भारत), शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया), शॉन पोलॉक ( दक्षिण आफ्रिका) यांनी अशी कामगिरी केली आहे.  कपिल देव यांच्यानंतर इंग्लंडविरुद्ध १००० धावा व १०० विकेट्स घेणारा अश्विन हा पहिलाच भारतीय आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धही अशी कामगिरी केली आहे.  

-  चेपॉकवर एकाच कसोटीत पाच विकेट्स व अर्धशतक करणारा आर अश्विन तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८०मध्ये कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध आणि २०१६मध्ये रवींद्र जडेजानं इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

- पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात अर्धशतक असे चेन्नईच्या खेळपट्टीवर भारतीय खेळाडूच्या बाबतीत तिसऱ्यांदा घडतंय. याआधी अजित वाडेकर ( ० व ६७ धावा वि. वेस्ट इंडिज, १९६७) आणि सचिन तेंडुलकर ( ० व १३६ धावा वि. पाकिस्तान १९९९) यांनी ही कामगिरी केलीय. विराट पहिल्या डावात शून्यावर माघारी परतला होता आणि दुसऱ्या डावात त्यानं ६२ धावा केल्या. Cheteshwar Pujara पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद; रोहित, रिषभही परतले माघारी, Video 

- आर अश्विननं शतक पूर्ण केल्यानं टीम इंडियाची आघाडी ४५० पार गेली आहे. यासह त्यानं एकाच कसोटीत शतक व पाच विकेट्स असा पराक्रम तिसऱ्यांदा केला. इयान बॉथम यांनी पाचवेळा असा पराक्रम केला आहे. गॅरी सोबर्स, एम मोहम्मद, जॅक कॅलिस, शकिब अल हसन यांनी प्रत्येकी दोन वेळा असा पराक्रम केला आहे. IPL 2021 लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू कामगिरी; २६ चेंडूंत चोपल्या ७७ धावा अन्...

- भारताकडून विनू मंकड ( वि. इंग्लंड १९५२), पॉली उम्रीगर ( वि. वेस्ट इंडिज १९६२) यांनी असा पराक्रम केला आहे. अश्विननं २०११ ( वि. वेस्ट इंडिज), २०१६ ( वि. वेस्ट इंडिज)  आणि आता २०२१ ( वि. इंग्लंड) यांच्याविरुद्ध हा पराक्रम करून दाखवला. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विन