Join us  

यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक! एकाही आशियाई फलंदाजाला न जमलेला नोंदवला विक्रम 

IND vs ENG 2nd Test Live Scorecard :  भारतीय संघाचा डाव सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने सावरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 1:24 PM

Open in App

IND vs ENG 2nd Test Live Scorecard :  भारतीय संघाचा डाव सलामीवीर यशस्वी जैस्वाल ( YASHASVI JAISWAL) याने सावरला आहे. दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्यानंतर यशस्वीने इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप दिला आणि टॉम हार्टलीला षटकार खेचून शतक पूर्ण केले. 

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. २० वर्षीय शोएब बशीरने इंग्लंडला मोठे यश मिळवून देताना रोहित शर्माची ( १४) विकेट घेतली. फॉर्मशी संघर्ष करणाऱ्या शुबमन गिलने चांगले फटके मारले. यशस्वीसह त्याने ६७ चेंडूंत ४९ धावा जोडल्या. पण, जेम्स अँडरसनने सूरात दिसलेल्या गिलची विकेट मिळवली. गिलने ४६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या, भारताला ८९ धावांवर दुसरा धक्का बसला. जेम्स अँडरसनने ७ इनिंग्जमध्ये पाचवेळा गिलला बाद केले. यशस्वी एका बाजूने संयमाने खेळत राहिला आणि त्याने ८९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यशस्वी व श्रेयस अय्यरने चांगली जोडी जमवली.

टॉम हार्टलीच्या एकाच षटकात यशस्वीने सलग तीन चौकार खेचले आणि त्यानंतर बशीरला टार्गेट केले. यशस्वीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडला. यापैकी ५०० धावा या त्याने ६ कसोटींत ५५.६७च्या सरासरीने चोपल्या आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ मध्ये ५०० धावा करणारा तो पहिला भारतीय आणि पहिला आशियाई फलंदाज ठरला. यशस्वीने 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडयशस्वी जैस्वालजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा