Join us

परफेक्ट सेटअप अन् जबरदस्त इनस्विंग! बुमराहनं नंबर वन टेस्ट बॅटरचा केला 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)

कमालीचा इनस्विंग; नंबर वन टेस्ट बॅटर हॅरी ब्रूक बघतच बसला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 22:10 IST

Open in App

भारतीय संघाचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह याने लंडन येथील लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा आपल्यातील धमक दाखवण्यासाठी मैदानात उतरला. पहिल्यांदा गोलंदाजीची वेळ आल्यावर सर्वांच्या नजरा त्याच्यावर होत्या. पण पहिल्या दोन सत्रात त्याने जोरही लावला. पण त्याच्या हाती विकेट काही लागली नाही. अखेर १५ षटकांच्या प्रतिक्षेनंतर १६ व्या षटकात त्याने टेस्टमधील नंबर वन बॅटरच्या रुपात  पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. हॅरी ब्रूकला एका सुंदर चेंडूवर बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

जड्डूनं सेट झालेली जोडी फोडली; मग पिक्चरमध्ये आला बुमराह

तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात इंग्लंडच्या संघाने पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्या. पण त्यानंतर जो रूट आणि ओली पोप जोडी जमली आणि या दोघांनी शतकी भागीदारी रचली. चहापानानंतर जड्डूनं ओली पोपला झेलबाद करत ही जोडी फोडली. ओली पोप १०४ चेंडूत ४४ धावा करून तंबूत परतला. त्याने रुटच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी रचली. ही विकेट गमावल्यावर जसप्रीत बुमराह पिक्चरमध्ये आला.   कसोटी क्रमवारीतील नंबर गोलंदाजानं नंबर वन बॅटर हॅरी ब्रूकची स्वस्तात शिकार केली. 

IND vs ENG : बुमराहच्या गोलंदाजीवर टीम इंडियालाच बसला धक्का; पंत 'आउट'! नेमकं काय घडलंं?

कमालीचा इनस्विंग; नंबर वन टेस्ट बॅटर हॅरी ब्रूक बघतच बसला!

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५५ व्या षटकात जसप्रीत बुमराहनं परफेक्ट सेटअप करून हॅरी ब्रूकला आपल्या जाळ्यात अडकवले. बुमराहने या षटकातील पहिले दोन चेंडू जवळपास १४० kph वेगाने आउटसाइड ऑफ लेंथवर टाकले.  तिसऱ्या चेंडूवर लेग स्टंप धरून मारा केल्यावर बुमराहनं पुन्हा आउटसाइड ऑफ लेंथवर मारा केला. चार चेंडू निर्धाव टाकल्यावर याच लेंथवर कमालीच्या इनस्विंगवर बुमराहनं हॅरी ब्रूकला बोल्ड केले. विकेट गमावल्यावर ब्रूक  आश्चर्यचकित झाला. त्याने २० चेंडूत २ चौकाराच्या मदतीने ११ धावांची भर घातली.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराह