Join us  

पत्नीचा प्रश्न अन् माजी खेळाडूचं उत्तर; दुसऱ्या सामन्यासाठी सांगितली भारताची प्लेइंग XI, सिराज बाहेर

IND vs ENG 2nd Test: सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर दुसरा सामना जिंकण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 8:47 PM

Open in App

भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. शुक्रवारपासून या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. सलामीच्या सामन्यात विजय मिळवून पाहुण्या इंग्लिश संघाने विजयी सलामी दिली. लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने त्याची प्लेइंग इलेव्हन निवडली असून मोहम्मद सिराजला दुसऱ्या सामन्यातून वगळले आहे. दुसरा कसोटी सामना उद्यापासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. 

दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात चार फिरकीपटूंना संधी मिळायला हवी. एक वेगवान गोलंदाज असावा आणि मोहम्मद सिराजला विश्रांती द्यायला हवी, असे कैफने सांगितले. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत पत्नीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एकमेव वेगवान गोलंदाजाला टीम इंडियात स्थान दिले. 

मोहम्मद कैफने निवडला भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, श्रेयस अय्यर, केएस भरत, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह. 

दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन -बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन 

दुसऱ्या सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि आवेश खान. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडमोहम्मद सिराजभारतीय क्रिकेट संघ