India vs England, 2nd Test Day 2 : भारतीय संघाला पहिल्या डावात ३२९ धावा करता आल्या असल्या तरी इंग्लंडलाही २३ धावांवर तीन धक्के बसले आहे. पदार्पणवीर अक्षर पटेल ( Axar Patel) यानं इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याची विकेट घेत टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. इशांत शर्मा व आर अश्विन यांनीही इंग्लंडला प्रत्येकी एकेक धक्के दिले. गोलंदाजांचं धक्का सत्र सुरू असताना टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारताचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हा आज क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरणार नाही. चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी पुजाराच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या दिवशी मैदानावर बदली खेळाडू म्हणून मयांक अग्रवाल आला आहे. इंग्लंडनं मोडला ६६ वर्षांपूर्वीचा भारताचाच विक्रम, रोहित शर्माचा मोठा पराक्रम
६ बाद ३०० धावांवरून दुसऱ्या डावाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्याच षटकात मोईन अलीनं ( Moeen Ali) दोन धक्के दिले. पण, रिषभ पंतनं ( Rishabh Pant) फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर गडगडला... रिषभ ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी फक्त २९ धावांची भर घालता आली. मोईन अली ४, ऑली स्टोन ३ आणि जॅक लिचने घेतल्या २ विकेट्स.. रोहित शर्मा २३१ चेंडूंत १८ चौकार व २ षटकारांसह १६१ धावांवर माघारी परतला. अजिंक्य रहाणेनं १४९ चेंडूंत ९ चौकारांसह ६७ धावा केल्या. रोहित-अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी ३१० चेंडूंत १६२ धावांची भागीदारी केली.
Rishabh Pant अन् बेन फोक्स यांच्यात राडा; भारतीय खेळाडूचा स्ट्राइक घेण्यास नकार, Video