Join us  

IND vs ENG, 2nd T20, Rohit Sharma: रोहित शर्मा आज खेळणार?; जाणून घ्या दुसऱ्या ट्वेंटी-२० टीम इंडियाचे संभाव्य ११ शिलेदार

IND vs ENG, 2nd T20 : Rohit Sharma back? पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाला २० षटकांत ७ बाद १२४ धावा करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 5:58 PM

Open in App
ठळक मुद्देभारत-इंग्लंड यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना आज खेळवण्यात येणार आहेपहिल्या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देऊन लोकेश राहुल- शिखर धवन जोडी उतरलेली मैदानावर

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : भारत-इंग्लंड पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात ( India vs England T20I) विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव मागे टाकून टीम इंडिया आज पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Cricket Stadium in Ahmedabad) हा सामना रंगणार आहे. विराट कोहली पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेत, आजच्या सामन्यात रोहित शर्माला ( Rohit Sharma) खेळवतो का?, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. Ind Vs Eng 2nd T20 Live Update Score पृथ्वी शॉनं कर्णधार म्हणून रचला इतिहास, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाच्या साथीनं जिंकलं जेतेपद

पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाला २० षटकांत ७ बाद १२४ धावा करता आल्या. शिखर धवन ( ४), लोकेश राहुल ( १) व विराट कोहली ( ०) हे अपयशी ठरल्यानंतर श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) डाव सावरला. त्यानं ६७ धावांची खेळी केली. रोहितच्या अनुपस्थितीत धवन व राहुल सलामीला आले परंतु त्यांना अपयश आलं. भारताचे ३ फलंदाज २० धावांवर माघारी परतले होते. तरीही टीम इंडियानं १२४ धावा केल्या. इंग्लंडने हा सामना १५.३ षटकांत सहज जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. Ind Vs Eng 2nd T20 Live Score, Ind vs Eng Live Score Today पृथ्वी शॉनं कुटल्या ८ सामन्यांत ८२८ धावा; कॅपवरील 'त्या' नावात शोधू लागलेत यशाचं रहस्य, Photo Viral

रोहितला पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार विराटनं पत्रकारपरिषदेत रोहित व लोकेश राहुल हे पहिल्या सामन्यात सलामीला येतील असे सांगितले होते. पण, प्रत्यक्ष सामन्यात रोहित न खेळल्यानं चाहते भडकले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहितला संधी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.  Mithali Raj : दोन सामने, दोन वर्ल्ड रेकॉर्ड; कॅप्टन मिताली राजनं उंचावली भारतीयांची मान!

संभाव्य टीम इंडिया India's predicted playing XI for 2nd T20I against England: रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुलशिखर धवन