IND vs ENG : 'लगान' वसूल! वानखेडेवर इंग्लंडला रोखत टीम इंडियानं फायनलसाठी ठोकला शड्डू

जेकब बेथल याने विक्रमी शतक झळकावले. पण शेवटी त्याची ही खेळी टीम इंडियाच्या धुरंधरांसमोर व्यर्थ ठरली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 22:51 IST2026-03-05T22:49:03+5:302026-03-05T22:51:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs ENG 2nd Semi Final India Beat England High Scoring Most Thriller Match And Enter Final Jacob Bethell | IND vs ENG : 'लगान' वसूल! वानखेडेवर इंग्लंडला रोखत टीम इंडियानं फायनलसाठी ठोकला शड्डू

IND vs ENG : 'लगान' वसूल! वानखेडेवर इंग्लंडला रोखत टीम इंडियानं फायनलसाठी ठोकला शड्डू

ICC T20 World Cup 2026, India vs England, 2nd Semi-Final : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये  इंग्लंडच्या संघाला रोखत भारतीय संघाने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने इंग्लंडच्या संघासमोर विक्रमी २५४ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना जेकब बेथल याची बॅट तळपली. पण शेवटी त्याची विक्रमी शतकी खेळी टीम इंडियाच्या धुरंधरांसमोर  व्यर्थ ठरली. भारतीय संघाने इंग्लंडला ७ बाद २४६ धावांवर रोखत ७ धावांनी विजय नोंदवत फायनल गाठली. ८ मार्चला टीम इंडिया अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध फायनल खेळताना दिसेल. 

धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने शंभरीच्या आत गमावल्या होत्या ४ विकेट्स

संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या धमाकेदार खेळीनंतर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्यासह तिलक वर्माने केलेल्या कडक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्या २५३ धावा केल्या होत्या. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नॉकआउटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. विक्रमी टार्गेट सेट केल्यावर हा सामना एकतर्फी होईल, असे वाटले होते. धावांचा पाठलाग करातना  इंग्लंडच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजीही स्वस्तात माघारी फिरले. धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने शंभरीच्या आत ४ विकेट्स गमावल्या होत्या.

जेकब बेथल-विल जॅक्सची जोडीनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, पण...

आघाडीच्या फळीतील फलंदाजी कोलमडल्यावर जेकब बेथल याने विल जॅक्सच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी ३९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी रचत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले. अक्षर पटेलनं सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत ही जोडी फोडली. हा या सामन्याचा एक टर्निंग पाइंट होता. २२ वर्षीय बेथल याने ४८ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १०५ धावांची विक्रमी खेळी केली. पण शेवटी तो संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडला. 

जसप्रीत बुमरासह पांड्याचा अचूक मारा

जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. हार्दिक पांड्याने फिल सॉल्टला तर बुमराहनं धोकादायक ठरू शकतो अशा हॅरी ब्रूकची शिकार केली. पॉवर प्लेमध्येच या विकेट्स घेण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. ही टीम इंडियाची जमेची बाजू ठरली. एवढेच नाही या दोघांनी रंगतदार झालेल्या सामन्यात डेथ ओव्हरमध्ये  कमालीची गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

Web Title : भारत ने इंग्लैंड को हराया, टी20 विश्व कप के फाइनल में जगह बनाई!

Web Summary : भारत ने रोमांचक सेमीफाइनल में इंग्लैंड को हराया, फाइनल में न्यूजीलैंड से मुकाबला होगा। भारत ने 253 रनों का विशाल स्कोर बनाया, जिसका पीछा करते हुए इंग्लैंड याकूब बेथेल के शतक के बावजूद चूक गया। बुमराह और पंड्या के महत्वपूर्ण विकेटों और डेथ बॉलिंग ने भारत को 7 रनों से जीत दिलाई।

Web Title : India defeats England, secures final berth in T20 World Cup!

Web Summary : India beat England in a thrilling semi-final, setting up a final clash against New Zealand. India posted a formidable 253, which England nearly chased down despite Jacob Bethell's century. Bumrah and Pandya's crucial wickets and death bowling sealed India's victory by 7 runs.