Join us

अबतक ३२! १६ महिन्यांनी संपला 'शतकी' दुष्काळ; रोहितनं पाचव्यांदा सिक्सर मारत साजरी केली सेंच्युरी!

रोहित शर्माची ९० चेंडूतील ही इनिंग १२ चौकार आणि ७ उत्तुंग षटकाराने सजलेली होती. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 20:50 IST

Open in App

IND vs ENG 2nd ODI  Rohit Sharma slams 76 ball hundred : इंग्लंड विरुद्धच्या कटकच्या बाराबती स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मानं वनडे कारकिर्दीतील ३२ व्या शतकाला गवसणी घातली. तब्बल १६ महिन्यांनी वनडेत त्याच्या भात्यातून शतक आल्याचे पाहायला मिळाले. आधी १२ डावानंतर त्याच्या भात्यातून अर्धशतक आले. मग ही खेळी आणखी मोठी करत त्याने शतकी दुष्काळही संपवला. रोहित शतकाच्या उंबरठ्यावर असताना आदिल रशीदनं फिल्ड प्लेसमेंटमध्ये बदल करत रोहित शर्माला हिंमत असेल तर षटकार मारून शतक साजरे करून दाखव, असे चॅलेंजच दिले होते. रोहितनं ही ते चॅलेंज स्वीकारलं अन् षटकार मारून शतक साजरेही केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पाचव्यांदा सिक्सर मारत साजरी केली सेंच्युरी

खणखणीत चौकार मारून अर्धशतक साजरे करणाऱ्या रोहित शर्मानं सिक्सर मारून सेंच्युरी साजरी केली. पाचव्यांदा त्याने षटकार मारून शतक साजरे केले आहे.  तो मॅच संपवूनच येणार असे वाटत होते. पण एक मोठा फटका खळण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् ११९ धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. रोहित शर्माची ९० चेंडूतील ही इनिंग १२ चौकार आणि ७ उत्तुंग षटकाराने सजलेली होती. 

१६ महिन्यांनी रोहितच्या भात्यातून आली शतकी खेळी

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं रविवारी ९ फेब्रुवारीला कटक येथील बाराबती स्टेडियमवर रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी करत पुन्हा आपला जुना तोरा दाखवून दिला. शतकी खेळी करत त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयार आहे, याचे संकेत दिले. मागील काही महिन्यांपासून त्याच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले नव्हते.  ११ ऑक्टोबर २०२३ नंतर रोहितच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले.  दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सामन्यात रोहित शर्मानं ८४ चेंडूत १३१ धावांची खेळी केली होती. हे त्याचे याआधीचे अखेरचे वनडे शतक होते.  

 

 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंड