कटकच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात सलामी जोडीनं हिट शो दाखवला. शुबमन गिलच्या जागा घेण्यासाठी आलेल्या विराट कोहलीला एकेरी धावसंख्येवरच तंबूचा रस्ता धरावा लागला. कोहलीच्या बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपर सॉल्टच्या हाती विसावला. इंग्लंडच्या ताफ्यातून जोरदार अपील झाली. पण मैदानातील पंचांनी त्याला नाबाद दिले. जोस बटलरनं रिव्ह्यू घेतला. अन् तो यशस्वी ठरला. बिग स्क्रीनवर बॅट-बॉल यांच्यातील संपर्क दाखवणारा स्पाईक दिसला अन् विराट कोहलीचा चेहरा पडला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आदिल रशीदनं चौथ्यांदा घेतली 'विराट' विकेट
वनडेत कोहली वर्सेस आदिल रशीद यांच्यात ९ वेळा आमना सामना झाला आहे. कोहलीनं ११८ चेंडूत इंग्लंडच्या या गोलंदाजाच्या विरुद्ध ११८ धावा केल्या आहेत. दुसरीकडे या गोलंदाजाने चार वेळा कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला आहे. जोस बटलरनं घेतलेला रिव्ह्यू यशस्वी ठरल्यावर विराट कोहलीचा चेहऱ्यावरची हावभाव बघण्याजोगी होती. त्याची ही झलक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.