Video : वातावरण तापले! जसप्रीत बुमराहचा 'खोडसाळपणा'; ऑली पोपची कर्णधार रोहितकडे तक्रार 

India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard : जसप्रीत बुमराहने चौथ्या दिवशी भारताला पहिले यश मिळवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 09:57 AM2024-01-28T09:57:13+5:302024-01-28T09:57:25+5:30

whatsapp join usJoin us
ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - Ollie Pope collides with Jasprit Bumrah, england batter complaining to rohit sharma  | Video : वातावरण तापले! जसप्रीत बुमराहचा 'खोडसाळपणा'; ऑली पोपची कर्णधार रोहितकडे तक्रार 

Video : वातावरण तापले! जसप्रीत बुमराहचा 'खोडसाळपणा'; ऑली पोपची कर्णधार रोहितकडे तक्रार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard : जसप्रीत बुमराहने चौथ्या दिवशी भारताला पहिले यश मिळवून दिले. ऑली पोपसोबत सातव्या विकेटसाठी किल्ला लढवणाऱ्या १९ वर्षीय रेहान अहमदला त्याने बाद केले. रेहान ५३ चेंडूंत २८ धावांची महत्त्वाची खेळी करून बाद झाला. पण, या पहिल्या सत्रात बुमराहचा खोडसाळपणा समोर आला. त्यामुळे विक्रमवीर ऑली पोपने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे तक्रार केली. 


इंग्लंडच्या पहिल्या डावातील २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा करून १९० धावांची आघाडी घेतली. यशस्वी जैस्वाल ( ८०), लोकेश राहुल ( ८६) व रवींद्र जडेजा ( ८७) यांना शतकाने हुलकावणी दिली. श्रीकर भरत ( ४१) व श्रेयस अय्यर ( ३५)यांनीही महत्त्वाच्या धावा जोडल्या. इंग्लंडकडून जो रूटने ४ विकेट्स घेतल्या. Ind vs Eng live match

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. झॅक क्रॉली ( ३१) व बेन डकेट ( ४७) यांनी चांगला खेळ केलेला, परंतु आर अश्विनने ही जोडी तोडली. इंग्लंडचा निम्मा संघ १६३ धावांत तंबूत परतला होता. पण, ऑली पोप व बेन फोक्स ( ३४) ही जोडी उभी राहिली आणि त्यांनी सहाव्या विकेटसाठी ११२ धावा जोडून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३१६ धावा करताना १२६ धावांची आघाडी घेतली होती. पोप २०८ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने १४८ धावांवर खेळत होता आणि रेहान १६ धावांवर नाबाद होता. IND vs ENG 1st Test Live Scoreboard


चौथ्या दिवशी पोपने १५० धावा पूर्ण केल्या आणि नवा विक्रम नावावर केला. भारतात कसोटीत १५० धावा करणारा तो तिसरा युवा इंग्लिश फलंदाज ठरला. १९५१ मध्ये टॉम ग्रॅव्हेनी यांनी २४ वर्ष व १८१ दिवसांचे असताना हा विक्रम केला होता. त्यानंतर १९८४ मध्ये टिम रॉबिन्सनने ( २६ वर्ष व २१ दिवस) आणि १९९३ मध्ये ग्रॅमी हिकने ( २६ वर्ष व २७२ दिवस) यांनी हा पराक्रम केलेला. पोप २६ वर्ष व २३ दिवसांचा आहे आणि त्याने या विक्रमात हिकला मागे टाकले. पोप व रेहान यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. Ind vs Eng 1st Test Live Updates


दिवसाच्या तिसऱ्या षटकात जसप्रीतच्या गोलंदाजीवर पोपने सुरेख फटका मारला आणि एक धाव घेण्यासाठी तो पळाला... तो पळत असताना बुमराह मुद्दाम त्याच्या मार्गात अडथळा निर्माण करताना दिसला. पोपने त्वरित रोहित व अम्पायरकडे याची तक्रार केली. रोहितने पोपच्या खांद्यावर हात मारून एक प्रकारे क्षमा मागितली. 

Web Title: ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - Ollie Pope collides with Jasprit Bumrah, england batter complaining to rohit sharma 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.