Join us

अश्विन-जडेजा यांचे अप्रतिम चेंडू; काही कळायच्या आत बेअरस्टो, स्टोक्स 'Clean Bowled'; Video  

IND vs ENG 1st Test Live Updates Day 3 - भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची पहिली दोन सत्र गाजवली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 14:21 IST

Open in App

IND vs ENG 1st Test Live Updates Day 3 ( Marathi News ) - भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची पहिली दोन सत्र गाजवली... इंग्लंडने सुरुवात चांगली केली होती, परंतु लंच ब्रेकनंतर जसप्रीत बुमराहने २ धक्के दिले आणि त्यानंतर रवींद्र जडेजाआर अश्विन यांच्या फिरकीवर इंग्लंडचे फलंदाज नाचले. जडेजा व अश्विन यांनी अनुक्रमे जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स यांचा अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवला. टी ब्रेकपर्यंत इंग्लंडने १७२ धावांवर ५ विकेट्स गमावल्या आहेत आणि अजूनही ते १८ धावांनी पिछाडीवर आहेत.   

इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली होती. झॅक क्रॉलीने ३३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३१ धावा केल्या, परंतु आऱ अश्विनने त्याला माघारी पाठवले. बेन डकेट व ऑली पोप यांनी ७च्या सरासरीने धावा चोपल्या होत्या. पण, लंच ब्रेकनंतर चित्र बदलले आणि जसप्रीत बुमराहने इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने ४७ धावा करणाऱ्या डकेटचा भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवला. त्यानंतर जसप्रीतने इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जो रूटला ( २) पायचीत केले. जसप्रीतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो रूटला ११ वेळा बाद केले आणि मिचेल स्टार्कशी बरोबरी केली.  

जॉनी बेअरस्टो येताच रोहितने अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांना गोलंदाजीवर आणले. पहिल्या डावात अक्षरने जसा त्रिफळा उडवला, तसाच यावेळी जडेजाने अप्रतिम चेंडूवर बेअरस्टोचा ( १०) स्टम्प उडवला. पोपने दुसऱ्या डावात अर्धशतक पूर्ण करत इंग्लंडला धीर दिला होता. बेन स्टोक्स मैदानावर येताच आर अश्विनला गोलंदाजीला आणले आणि त्याने इंग्लंडच्या कर्णधाराला दडपणात ठेवले. दोन षटकं निर्धाव खेळण्यास भाग पाडल्यानंतर अश्विनने एका अप्रतिम चेंडूवर स्टोक्सचा त्रिफळा उडवला. स्टोक्सला काही कळण्याआधीच स्टम्प उखडला आणि इंग्लंडचा निम्मा संघ १६३ धावांवर माघारी परतला. अश्विनने सर्वाधिक १२वेळा स्टोक्सला बाद केले. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनरवींद्र जडेजाबेन स्टोक्स