IND vs ENG: शतक झळकावण्यात अ'यशस्वी' पण मनं जिंकली; दिवसातील चौथ्याच चेंडूवर इंग्लंडला 'यश'

IND vs ENG 1st Test Match Live Updates In Marathi: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 09:53 AM2024-01-26T09:53:39+5:302024-01-26T09:54:29+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st Test Match Live Yashasvi Jaiswal was dismissed for 80 runs and was dismissed by Joe Root | IND vs ENG: शतक झळकावण्यात अ'यशस्वी' पण मनं जिंकली; दिवसातील चौथ्याच चेंडूवर इंग्लंडला 'यश'

IND vs ENG: शतक झळकावण्यात अ'यशस्वी' पण मनं जिंकली; दिवसातील चौथ्याच चेंडूवर इंग्लंडला 'यश'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 1st Test Match Live Updates । हैदराबाद: सलामीच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच इंग्लिश संघाला मोठे यश मिळाले. पहिल्या दिवसअखेर स्फोटक खेळी करून नाबाद परतलेल्या यशस्वी जैस्वालला बाद करण्यात जो रूटला यश आले. इंग्लंडकडून दुसऱ्या दिवसातील पहिले षटक टाकण्यासाठी रूट आला. त्याने पहिला चेंडू निर्धाव टाकला मग दुसऱ्या चेंडूवर जैस्वालने चौकार ठोकला. तिसरा चेंडू निर्धाव गेल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेला जैस्वाल फसला अन् चौथ्या चेंडूवर बाद झाला. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून चौकार मारण्याच्या प्रयत्नात असलेला यशस्वी रूटच्या गोलंदाजीवर त्याच्याच हातून झेलबाद झाला. 

भारताने पहिल्या दिवसअखेर १९ षटकांत १ बाद ११९ धावा केल्या होत्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालने आजही त्याच्या शैलीप्रमाणे स्फोटक खेळी करण्याचा प्रयत्न केला. पण चौकार मारून त्याला तंबूत परतावे लागले. त्याने १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७४ चेंडूत ८० धावांची अप्रतिम खेळी केली.  

दरम्यान, गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. सलामीचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव अवघ्या २४६ धावांवर आटोपला. इंग्लिश संघाकडून कर्णधार बेन स्टोक्सने दमदार खेळी केली पण त्यालाही सन्मानजनक धावसंख्या उभारता आली नाही. पाहुण्या संघाने आपल्या पहिल्या डावात ६४.३ षटकांत सर्वबाद २४६ धावा केल्या. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारून मजबूत आघाडी घेण्याची चांगली संधी यजमान भारताकडे आहे. 

पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह. 

पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - 
बेन स्टोक्स (कर्णधार), जोनी बेअरस्टो, झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच. 

Web Title: IND vs ENG 1st Test Match Live Yashasvi Jaiswal was dismissed for 80 runs and was dismissed by Joe Root

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.