India vs England 1st T20 I Live Updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना आज साऊथहॅम्प्टन येथे रात्री १०.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) चे पुनरागमन होत असल्याने भारतीय चाहते आनंदात आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पूर्णवेळ हाती घेतल्यानंतर परदेशातील ही रोहितची पहिलीच मालिका आहे. इयॉन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर इंग्लंडही नवा कर्णधार जोस बटलर याच्या नेतृत्वाखाली प्रथमच खेळणार आहे. त्यामुळे रोहित वि. बटलर हा सामना पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
भारतीय संघाने पंजाब किंग्सचा गोलंदाज अर्षदीप सिंग याला आज पदार्पणाची संधी दिली आहे. हिटमॅनने स्वतः अर्षदीपला पदार्पणाची कॅप दिली. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संघ भारत- रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, अर्षदीप सिंग ( India: 1 Rohit Sharma (capt), 2 Ishan Kishan, 3 Suryakumar Yadav, 4 Deepak Hooda, 5 Hardik Pandya, 6 Dinesh Karthik (wk), 7 Axar Patel, 8 Harshal Patel, 9 Bhuvneshwar Kumar, 10 Yuzvendra Chahal, 11 Arshdeep Singh)
इंग्लंड - जोस बटलर, जेसन रॉय, डेवीड मलान, लिएम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, हॅरी ब्रूक, रिसे टॉपले, टायमल मिल्स, मॅथ्यू पर्किनसन ( England: 1 Jason Roy, 2 Jos Buttler (capt & wk), 3 Dawid Malan, 4 Moeen Ali, 5 Liam Livingstone, 6 Harry Brook, 7 Sam Curran, 8 Chris Jordan, 9 Tymal Mills, 10 Reece Topley, 11 Matt Parkinson)