Ind vs Eng 1st T20 : कॅमेरामननं छबी टिपली अन् बघता बघता 'ती' फेमस झाली, पाहा फोटो

Ind vs Eng 1st T20 : या सामन्यात कॅमेरामननं स्टेडियमवर उपस्थित एका मुलीकडे कॅमेरा वळवला अन् सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 09:05 AM2021-03-13T09:05:00+5:302021-03-13T13:56:11+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 1st T20 : cameraman never disappoints; girl famous during India vs England 1st T20I  | Ind vs Eng 1st T20 : कॅमेरामननं छबी टिपली अन् बघता बघता 'ती' फेमस झाली, पाहा फोटो

Ind vs Eng 1st T20 : कॅमेरामननं छबी टिपली अन् बघता बघता 'ती' फेमस झाली, पाहा फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 1st T20 Live Update Score : कसोटी मालिकेतील दमदार विजयानंतर ट्वेंटी-20 मालिकेत मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. रोहित शर्माला ( Rohit Sharma) विश्रांती देऊन नवी सलामीची जोडी मैदानावर उतरवण्याचा विराट कोहलीचा ( Virat Kohli) डाव फसला. शिखर धवन, लोकेश राहुल व विराट कोहली हे तिघेही फलकावर २० धावा असताना माघारी परतले. विराट ( Virat) आदिल राशिदच्या गोलंदाजीवर शून्यावर झेलबाद होऊन माघारी परतला. श्रेयस अय्यरनं डाव सावरला अन् टीम इंडियाला ४ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारून दिली.  Ind Vs Eng 1st T20 Live Match रिषभ पंतचा 'खतरनाक' शॉट; युवराज सिंग म्हणतो, ही जनरेशन बिनधास्त, निर्भय... Video

जेसन रॉय ( Jason Roy) आणि जोस बटलर ( Jos Buttler) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी ८ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलनं ( Yuzvendra Chahal) यानं इंग्लंडला पहिला धक्का दिला अन् भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक ६० विकेट्स घेण्याचा मान पटकावला. त्यानं जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला. पण, इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला गेला होता. जेसन रॉयनं ३२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. डेवीड मलान २४, तर जॉनी बेअरस्टो २६ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडनं ८ विकेट्स व २७ चेंडू राखून सामना जिंकला.  रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांचा अतरंगी शॉट; BCCI विचारतंय कोणाचा फटका सर्वाधिक भावला?, Video Ind Vs Eng 1st T20, 

या सामन्यात कॅमेरामननं स्टेडियमवर उपस्थित एका मुलीकडे कॅमेरा वळवला अन् सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू झाली.








 

Web Title: Ind vs Eng 1st T20 : cameraman never disappoints; girl famous during India vs England 1st T20I 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.