Ind vs Eng 1st T20 : रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांचा अतरंगी शॉट; BCCI विचारतंय कोणाचा फटका सर्वाधिक भावला?, Video

Ind Vs Eng T20 Live Update Score : रोहित शर्माला ( Rohit Sharma) विश्रांती देऊन पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ( Ind Vs Eng 1st T20 Live Match) लोकेश राहुल ( KL Rahul) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) ही नवी जोडी सलामीला उतरवण्याचा निर्णय फसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 09:02 PM2021-03-12T21:02:19+5:302021-03-12T21:03:01+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 1st T20 Live : Who did it better? Rishabh Pant or Hardik Pandya? watch video  | Ind vs Eng 1st T20 : रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांचा अतरंगी शॉट; BCCI विचारतंय कोणाचा फटका सर्वाधिक भावला?, Video

Ind vs Eng 1st T20 : रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांचा अतरंगी शॉट; BCCI विचारतंय कोणाचा फटका सर्वाधिक भावला?, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरिषभनं जोफ्राला, तर हार्दिकनं बेन स्टोक्सला चकित केलंश्रेयस ४८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६७ धावांवर माघारी परतला

Ind Vs Eng T20 Live Update Score : रोहित शर्माला ( Rohit Sharma) विश्रांती देऊन पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ( Ind Vs Eng 1st T20 Live Match) लोकेश राहुल ( KL Rahul) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) ही नवी जोडी सलामीला उतरवण्याचा निर्णय फसला. राहुल ( १), कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) भोपळा आणि शिखऱ धवन ( ४) हे आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानं टीम इंडिया अडचणीत आली होती. पण, रिषभ पंतनं ( Rishabh Pant) फटकेबाजी करून गाडी रुळावर आणली. त्यानंतर श्रेयस अय्यर व हार्दिक पांड्या या जोडीनं दाणपट्टा चालवला आणि संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. या सामन्यात रिषभ व हार्दिक यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना अतरंगी शॉट्स मारला आणि कोणाचा फटका सर्वाधिक भावला, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

पाहा व्हिडीओ..


फिरीकपटू आदील राशीदला पहिलं षटक देऊन इंग्लंडनं त्यांची रणनीती स्पष्ट केली होती. त्यात जोफ्रा आर्चरनं दुसऱ्याच षटकात टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलला ( KL Rahul) माघारी पाठवले. आर्चरच्या त्या षटकात कर्णधार विराट कोहलीलाही ( Virat Kohli) अवघड गेलं. त्यात तिसऱ्या षटकात राशीदच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो सोपा झेल देऊन माघारी परतला. भारताचे दोन फलंदाज ३ धावांवर बाद झाले. रिषभनं सुरुवातीपासून इंग्लंडच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण करत फटकेबाजी केली. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) १४१ kmph च्या वेगानं टाकलेला चेंडू रिषभनं 'खतरनाक' फटका मारून रिव्हर्स फटक्यानं यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सीमापार पाठवला. हा फटका पाहून जोफ्रासह इंग्लंडच्या अन्य खेळाडूंनी तोंडात बोटं टाकली. Ind Vs Eng 1st T20 Live Update Score

रिषभ २३ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचून २१ धावांवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. हार्दिक २१ चेंडूंत १९ धावा ( १ चौकार व १ षटकार) करून माघारी परतला. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) ४ षटकांत १ निर्धाव षटक टाकून २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  Ind vs Eng Live Score Today टीम इंडियाला २० षटकांत ७ बाद १२४  धावांचा समाधानकारक पल्ला गाठता आला. श्रेयस ४८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६७ धावांवर माघारी परतला. Ind Vs Eng 1st T20 Match Today, Ind Vs Eng 1st T20 Live Match

Web Title: Ind vs Eng 1st T20 Live : Who did it better? Rishabh Pant or Hardik Pandya? watch video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.